फळे आणि भाजीपाल्याची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी ऑस्ट्रिया येथील ग्रेझ तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी खास जैविक पद्धती विकसित केल्या आहेत. या पर्यावरणपूरक पद्धती असून, त्यामुळे फळे व भाज्यांवरील नैसर्गिक जिवाणूंच्या समुदायाला कोणताही धोका पोचत नाही. मात्र, कुजीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या बुरशींना रोखणे शक्य होते. पिकांची काढणी झाल्यानंतर त्यांची साठवणूक काही काळापर्यंत करणे आवश्यक असते. यामुळे ते उत्पादन दूरवरच्या बाजारपेठेपर्यंत पाठविणे, ग्राहकांपर्यंत पोचणे आणि त्यानंतरही काही साठविणे शक्य होते. मात्र, पिकाच्या काढणीनंतर होणारे नुकसान हा काढणीपश्चात साखळीतील सर्वात कमकुवत दुवा आहे. या टप्प्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार, जागतिक फळे आणि भाज्यांच्या उत्पादनातील सुमारे अर्धा भाग (४५ टक्के) उत्पादन हे ग्राहकापर्यंत पोचण्यापूर्वी खराब होते. या नुकसानीमध्ये कीडरोगांचा प्रादुर्भाव आणि अयोग्य साठवण स्थितीचा मुख्य वाटा असतो. यात प्रामुख्याने ताज्या भाज्या व फळांची कुज होणे, श्वसन आणि बाष्पीभवनामुळे त्यातील आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन नुकसान होणे यांचा समावेश होतो. यापासून बचावासाठी सध्या प्रामुख्याने विविध रसायनांचा वापर होतो. त्याऐवजी जैविक पद्धतीचा शोध ग्रेझ तंत्रज्ञान विद्यापीठातील पर्यावरणीय जैव तंत्रज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रियन औद्योगिक जैव तंत्रज्ञान केंद्राच्या साह्याने घेतला आहे. त्यांनी सफरचंद आणि शर्कराकंद यांची साठवण सुधारण्यासाठी विविध पद्धतींच्या चाचण्या घेतल्या आहेत. सफरचंदाचा साठवण कालावधी वाढला
नैसर्गिक सूक्ष्मजीवांना धोका नाही...
जैविक संरक्षण शर्कराकंदासाठीही फायदेशीर साठवणीतील नुकसानीमुळे सफरचंदाप्रमाणेच शर्कराकंदाचेही मोठे नुकसान होते. त्यासाठी संशोधकांनी पर्यावरणपूरक पद्धतीचा शोध घेतला. ऑस्ट्रियन औद्योगिक जैव तंत्रज्ञान केंद्रातील संशोधक पीटर कुस्स्तातश्चर यांनी एक खास जैव नियंत्रक घटक विकसित केला आहे. त्याच्याही चाचण्या घेण्यात आल्या. त्याविषयी माहिती देताना कुस्स्तातश्चर म्हणाले की, शर्कराकंदावरील प्रक्रियेमुळे त्यातील शर्करेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे समोर आले. त्यातही कुजीसाठी संवेदनशील असलेल्या प्रक्षेत्रातून काढलेल्या शर्कराकंदावर त्वरेने प्रक्रिया केल्यास भविष्यात नुकसान टाळता येते. अशा कुजीमुळे होणारे शर्करेचे केवळ जर्मनीतील नुकसान प्रति दिन पाच लाख युरोपेक्षाही अधिक आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.