‘यांत्रिकीकरण योजने’ची शालेय मुलांकडून जनजागृती

कोल्हापूर : कृषी यांत्रिकीकरण योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी कृषी विभागाने एक नवा फंडा दुर्गम अशा चंदगड तालुक्यात सुरू केला आहे. या योजनेची माहिती पत्रके विविध शाळांमधील मुलांना वाटण्यात आली आहेत.
Of the ‘mechanization scheme’ Awareness from school children
Of the ‘mechanization scheme’ Awareness from school children
Published on
Updated on

कोल्हापूर : कृषी यांत्रिकीकरण योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी कृषी विभागाने एक नवा फंडा दुर्गम अशा चंदगड तालुक्यात सुरू केला आहे. या योजनेची माहिती पत्रके विविध शाळांमधील मुलांना वाटण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत या योजनेची माहिती घराघरांत जावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विशेष म्हणजे याचा सकारात्मक परिणाम होऊन योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

चंदगड तालुक्यात आडवळणी गावे असल्याने प्रत्येक ठिकाणी एखाद्या योजनेची माहिती घराघरापर्यंत पोचवणे सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना अशक्य बनते. उपलब्ध कर्मचारी व प्रसाराच्या यंत्रणा यामुळे अनेक योजना कागदावरच राहतात. त्यामुळे गडहिंग्लज उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय व चंदगड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने एक हटके प्रयोग राबविला.

प्रत्येक मुलाच्या हातात यांत्रिकीकरण योजनेची माहिती देणारी पत्रके पोचवली. ही पत्रके आठवणीने आई-वडिलांना देण्याच्या सूचना शिक्षकांमार्फत मुलांना केल्या. मुलांमार्फत ही पत्रके थेट पालकांच्या हातात पोचवण्यात आली. 

तालुक्यातील ६४ शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. आश्चर्य म्हणजे या योजनेत शेतकऱ्यांची संख्या वाढली. कृषी विभागाने शेजारील तालुक्यांमध्ये देखील हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. 

कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुलांमार्फत शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची योजना आम्हाला सुचली. ती तातडीने अमलात आली. या प्रयत्नाचे फलित आम्हाला दिसत आहे.  उपविभागातील गडहिंग्लज, चंदगड, आजरा, भुदरगड येथील सुमारे ४५० ग्रामपंचायती आणि ५०० शाळांमध्ये हा उपक्रम येत्या आठवड्यात राबविणार आहोत. - भाग्यश्री फरांदे -पवार, उपविभागीय कृषी अधिकारी, गडहिंग्लज.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com