‘Indigenous Seed Cultivation The work should be a mass movement. '
‘Indigenous Seed Cultivation The work should be a mass movement. '

‘देशी बियाणे संवर्धनाचे कार्य जनचळवळ व्हावी’

अमरावती ः ‘‘भारतीय शेतीपद्धतीला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा नव्या पिढीसाठी जपून ठेवायचा असेल, तर शक्‍य असेल, त्या सर्वांनी देशी बियाणे संवर्धनाच्या मोहिमेत सहभागी होऊन याला जनचळवळीचे रूप द्यावे’’, असे प्रतिपादन बीजमाता राहीबाई पोपरे यांनी केले.
Published on

अमरावती ः ‘‘भारतीय शेतीपद्धतीला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा नव्या पिढीसाठी जपून ठेवायचा असेल, तर शक्‍य असेल, त्या सर्वांनी देशी बियाणे संवर्धनाच्या मोहिमेत सहभागी होऊन याला जनचळवळीचे रूप द्यावे’’, असे प्रतिपादन बीजमाता राहीबाई पोपरे यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ अंतर्गंत पशुशक्‍तीचा योग्य वापर प्रकल्प तसेच कृषी विज्ञान केंद्र घातखेड यांच्या वतीने लवाद (ता. धारणी, जि. अमरावती) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, आमदार राजकुमार पटेल, रवींद्र कोल्हे, प्रकल्प समन्वयक डॉ. महाराणी दिन, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. राजेंद्र गाडे, माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, डॉ. अतुल कळसकर उपस्थित होते. 

डॉ. ढवण म्हणाले, ‘‘शेतीक्षेत्रात अवजारांचा वापर वाढल्यास मनुष्याचे श्रम कमी होतील. त्यासोबतच वेळ देखील वाचेल. हा पर्याय शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी देखील पूरक ठरणारा आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे विकसित विविध अवजारांचा वापर केल्यास आदिवासी शेतकऱ्यांचे देखील उत्पन्न दुप्पट होईल. त्यासाठी तंत्रज्ञान वापराविषयक जागृती वाढविण्याची गरज आहे.’’

भाले यांनी आदिवासी शेतकऱ्यांना अवजारांची उपलब्धता करून दिल्याबद्दल मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. या माध्यमातून शेतीतील श्रम कमी होण्यास हातभार लागेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. डॉ. स्मिता सोलंकी यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com