‘सीएससी’, बॅंकेकडून विमा काढताना शेतकऱ्यांची लूट

नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत खरिपासाठी पीकविमा भरण्याचे काम सीएससी (जन सुविधा केंद्र), बॅंका, संग्राम कक्षामार्फत चालू आहे. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर प्रतिअर्ज २४ रुपये शुल्क शासनाकडून संबंधित एजन्सीला मिळतात.
 ‘सीएससी’, बॅंकेकडून विमा काढताना शेतकऱ्यांची लूट ‘CSC’, insurance from the bank Looting of farmers while removing
‘सीएससी’, बॅंकेकडून विमा काढताना शेतकऱ्यांची लूट ‘CSC’, insurance from the bank Looting of farmers while removing

नांदेड : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत खरिपासाठी पीकविमा भरण्याचे काम सीएससी (जन सुविधा केंद्र), बॅंका, संग्राम कक्षामार्फत चालू आहे. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर प्रतिअर्ज २४ रुपये शुल्क शासनाकडून संबंधित एजन्सीला मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. परंतु जिल्ह्यात ‘सीएससी’ तसेच काही बॅंका पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रतिअर्ज पन्नास ते दोनशे रुपयांची लूट करण्यात येत आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात खरिपातील सहा पिकांसाठी विमा भरण्याचे काम इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून सुरू आहे. पीकविमा भरण्याचा कालावधी एक जुलै ते १५ जुलैपर्यंत असल्याने जिल्हा प्रशासन, कृषी विभाग तसेच कंपनीकडून शेतकऱ्यांना पीकविमा भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा विमा सीएससी, बॅंका, संग्राम कक्षामार्फत चालू आहे. कंपनीकडून या एजन्सींना शेतकऱ्यांनी पीकविमा भरल्यानंतर प्रति अर्ज २४ रुपये शुल्क देण्यात येते. असे असताना जिल्ह्यातील सीएससी, काही बॅंकातही शेतकऱ्यांकडून प्रति अर्ज पन्नास ते दोनशे रुपयांपर्यंत शुल्क आकारून लूट करत आहेत. असा प्रकार मागील वर्षीही झाला होता. परंतु संबंधित यंत्रणा आणि सीएससी धारकांच्या मधुर संबंधांमुळे या बाबत कार्यवाही झाली नव्हती. यंदा खरिपात झालेले नुकसान, नाकारला गेलेला विमा, बियाण्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी अडचणीत असतानाही लुटण्याचे काम सुरू आहे. ही लूट थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन, कृषी विभाग व कंपनीकडून संबंधितांना ताकीद द्यावी, अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया पीकविमा भरल्यानंतर सीएससीधारकांना प्रति अर्ज २४ रुपये कंपनीकडून मिळतात. त्यामुळे सीएससीधारकांना शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, अशा सूचना बैठकीत दिल्या आहेत. कंपनीच्या माहिती पत्रकातही शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी पैसे लागत नसल्यानेच नमूद केले आहे.  -गोपालसिंग वाघमारे, जिल्हा समन्वयक, सीएससी नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com