नगर विभागात ऊसगाळपात यंदाही खासगी साखर कारखानेच आघाडीवर

नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी अशा २६ साखर कारखान्यांकडून नगर विभागात उसाचे गाळप सुरू आहे. आतापर्यंत ८४ लाख टन उसाचे गाळप झाले असून ७९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊसगाळपात नेहमीप्रमाणे खासगी साखर कारखान्याची आघाडी असल्याचे दिसून येत आहे.
This year also in the sugarcane field in the city Leading private sugar factory
This year also in the sugarcane field in the city Leading private sugar factory
Published on
Updated on

नगर, ः नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी अशा २६ साखर कारखान्यांकडून नगर विभागात उसाचे गाळप सुरू आहे. आतापर्यंत ८४ लाख टन उसाचे गाळप झाले असून ७९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊसगाळपात नेहमीप्रमाणे खासगी साखर कारखान्याची आघाडी असल्याचे दिसून येत आहे. यंदा विभागात ऊस अधिक असल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. 

नगर विभागात यंदा सतरा सहकारी तर ९ खासगी असे सव्वा साखर कारखान्याकडून उसाचे गाळप सुरू आहे. त्यातील नगर जिल्ह्यातील २२ व नाशिक जिल्ह्यातील ४ साखर कारखान्याचा समावेश आहे. विभागात सुरू असलेल्या साखर कारखान्याची दररोजची गाळप क्षमता १ लाख १० हजार २५० टन आहे. सध्या दररोज १ लाख ५ हजार टनांपर्यंत उसाचे आणि तेवढेच क्विंटल साखर उत्पादन होत आहे. ऊस गाळपात संगमनेर, ज्ञानेश्‍वर, मुळा हे सहकारी साखर कारखाने सोडले तर यंदाही खासगी कारखानेच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत राशीनच्या अंबालिका साखर कारखान्याने सर्वाधिक साडेलाख टनांपर्यंत उसाचे गाळप केले आहे. यंदा सुमारे एक कोटी वीस लाख टन ऊस उपलब्ध असून नगर जिल्ह्यात सुमारे सव्वा कोटी टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. त्यात कार्यक्षेत्राबाहेरील २० लाख टन ऊस येण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा किमान दहा लाख टन अधिक उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात अतिरिक्त ऊस असल्याने अतिरिक्त उसाचाही प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. 

यंदाचे ऊसगाळप (२० जानेवारीअखेर)  शंकरराव कोल्हे (कोपरगाव) ः ३,७६,२१९, शंकरराव काळे (कोळपेवाडी) ः ३,३०,४६६, गणेश (राहाता) ः अशोक (श्रीरामपज्ञाराव विखे पाटील (लोणी) ः राहुरी फॅक्टरी (राहरी) ः सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) ः सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (संगमनेर) ः ६,२२,५३०, ज्ञानेश्‍वर (भेंडा, नेवासा) ः ६,५८,०१०, वृद्धेश्‍वर (पाथर्डी) ः २,२३,५१७, कुकडी (पिंपळगाव पिसा, श्रीगोंदा) ः ३,९५,९००, मुळा (सोनई, नेवासा) ः ५,६८,९८०, अगस्ती (अकोले) ः २,६२,४५३, केदारेश्‍वर (बोधेगाव, शेवगाव) ः २,१९,२५०, क्रांतीशुगर (पारनेर) ः ७६,१९५, पीयूष (वाळकी, नगर) ः १,०९,०१५, अंबालिका (राशीन, कर्जत) ः ९,२९,३५०, गंगामाई (शेवगाव) ः ५,५१,९५०, साईकृपा (देवदैठण, श्रीगोंदा) ः १,४५,२१०, प्रसाद शुगर (वांबोरी, राहुरी) ः ३,२६,६९०, जय श्रीराम (हादगाव, जामखेड) ः १,६०,७९०, यूटेक (मलकापूर, संगमनेर) ः २१४२२०, के. के. वाघ (निफाड, नाशिक), ः ६२,५४६, कादवा (मातेरेवाडी, दिंडोरी) ः १,९९,८०२, वसंतदादा पाटील (कळवण) ः १,०४,310३१०, द्वारकाधीश (शेवरे, सटाणा) ः २,९८,६९५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com