पश्‍चिम वाहिनी नदी खोऱ्यातील  पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार

पश्‍चिम वाहिनी नदी खोऱ्यातील अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक असलेली कार्यवाही प्रगतिपथावर असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून जलमित्र सुखदेव फुलारी यांना देण्यात आली आहे.
In the western channel river basin Water will be diverted to Godavari valley
In the western channel river basin Water will be diverted to Godavari valley
Published on
Updated on

नगर : पश्‍चिम वाहिनी नदी खोऱ्यातील अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक असलेली कार्यवाही प्रगतिपथावर असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून जलमित्र सुखदेव फुलारी यांना देण्यात आली आहे. राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील ३० सप्टेंबर रोजी नेवासे तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता, भेंडे येथे जलमित्र सुखदेव फुलारी व डॉ. अशोक ढगे यांनी त्यांना नदीजोड योजनांचे काम तातडीने हाती घेऊन, कार्यान्वित करून तूट असलेल्या गोदावरी खोऱ्यात पश्‍चिम घाट माथ्यावरील पाणी प्राधान्याने सोडून पाण्याची उपलब्धता वाढविणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाच्या कक्ष अधिकारी समृद्धी आत्राम यांनी जलमित्र सुखदेव फुलारी यांना शासनाचे वतीने पत्र पाठवून पश्‍चिम वाहिनी नदी खोऱ्यातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे व नद्या जोड प्रकल्पांची सध्याची वस्तुस्थिती अवगत केली आहे. फुलारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, शासन निर्णय १९ सप्टेंबर २०१९ अन्वये आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरण-गोदावरी व दमणगंगा-एकदरे- गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राज्याच्या निधीतून त्वरित हाती घेण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. गोदावरी नदीजोड योजनाची अंदाजपत्रके मूल्यार्पणास्तव नाशिकच्या राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्यात आले.  दमणगंगा वैतरण- गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड योजनाचे सविस्तर प्रकल्प तयार करण्याचे काम राष्ट्रीय जलविकास अभिकरण यांच्याकडून प्रगतीत आहे. मराठवाड्यातील तूट भरून काढण्यासाठी कोकणातून नदीजोड प्रकल्पामार्फत गोदावरी खोऱ्यात पाणी वळविणे प्रस्तावित आहे. राज्य एकात्मिक जलआराखड्यात ११५ टीएमसी पाणी वळविणेची तरतूद आहे. त्याबाबत योजनांचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी शासन निर्णय १७ सप्टेंबर २०१९ अन्वये औरंगाबादच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. समितीने त्यांचा अहवाल ३१ ऑक्टोबर २०१९ ला शासनास सादर केला. त्यानुसार गोदावरी खोऱ्यात कोकणातील नार-पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोऱ्यातून एकूण ८९.८५ अ.घ.फू. पाणी वळविण्याबाबत आखणी करून त्याबाबत शिफारस केली आहे. पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे गोदावरी नदीजोड योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया नगर जिल्ह्यातील अकोलेपासून नाशिक, कोकणातील पश्‍चिम दिशेने वाहणाऱ्या नदीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले, तर नगर, मराठवाड्याला मोठा फायदा होईल. सरकारी पातळीवर त्याबाबत काम सुरू असल्याचे समाधान वाटते. -सुखदेव फुलारी, भेंडा, ता. नेवासा  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com