शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतीमाल वाहतुकीसाठी व प्रवाशांसाठी आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यांना वरदान ठरणार आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी मोजणी करून द्यावी. रेल्वेमुळे विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ We will give proper compensation to the farmers for the land
शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ We will give proper compensation to the farmers for the land

मंचर, जि. पुणे : ‘‘पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतीमाल वाहतुकीसाठी व प्रवाशांसाठी आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यांना वरदान ठरणार आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी मोजणी करून द्यावी. रेल्वेमुळे विकासाला मोठी चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीच्या मोबदल्याबाबत वाटाघाटी करून समाधानकारक तोडगा काढून प्रकल्प पूर्ण करण्याचे धोरण आहे,’’ असे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.   निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथे खेड ते सिन्नर बाह्य वळण चौपदरीकरण रस्ता व हायस्पीड रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्यानंतर डॉ. कोल्हे बोलत होते. या वेळी खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्गाचे शासकीय समन्वयक अभियंता दिलीप मेदगे, प्रतिनिधी महारेलचे डीजीएम सुनील हवालदार, महारेलचे भूसंपादन विभाग जनरल मॅनेजर जयंत पिंपळकर, तहसीलदार रमा जोशी, विवेक वळसे पाटील, संतोष भोर, राजेंद्र थोरात उपस्थित होते.  निघोटवाडी हद्दीत बाह्य वळण एक किलोमीटरच्या अंतरामध्ये फक्त दोन मोऱ्या टाकलेल्या आहेत. निघोटवाडी परिसरात पडणारे पावसाचे पाणी रस्त्या लगत साचत आहे. त्यामुळे जमीन नापिक होण्याचा धोका आहे. सर्विस रस्ता दिलेला नाही. या बाबत रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटाराद्वारे पाणी ओढ्यास सोडण्याची व्यवस्था केली जाईल. रस्त्याच्या दुतर्फा रॅम्प बनवून देण्यात येईल, गावकऱ्यांचे समाधान होईल, असे काम करण्याच्या सूचना डॉ. कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.   रस्त्यात जमिनी गेल्या आहेत. बरेचशे शेतकरी भूमिहीन झालेले आहेत. अजून रेल्वेसाठी जमीन संपादन झाल्यास शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी जमीन शिल्लक राहणार नाही. निवास व बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. रस्त्यासाठी सर्वात कमी मोबदला मिळालेला आहे. आदी समस्या सरपंच नवनाथ निघोट, शिवाजी निघोट, समीर निघोट, बाळशिराम निघोट, सुरेश निघोट, अजित निपोट, सुभाष निघोट, शामकांत निघोट, विपुल निघोट यांनी व्यक्त केल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com