पाणीपुरवठा योजनांसाठी तातडीने जलस्त्रोत शोधा

वाशीम जिल्ह्यात ज्या गावांसाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावयाच्या आहेत, त्या योजनांसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी तातडीने जलस्त्रोत शोधावेत.
पाणीपुरवठा योजनांसाठी तातडीने जलस्त्रोत शोधा For water supply schemes Find a source of water immediately
पाणीपुरवठा योजनांसाठी तातडीने जलस्त्रोत शोधा For water supply schemes Find a source of water immediately

वाशीम : जिल्ह्यात ज्या गावांसाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावयाच्या आहेत, त्या योजनांसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी तातडीने जलस्त्रोत शोधावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित जल जीवन मिशन आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता साळुंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राऊत व इतर उपस्थित होते. षण्मुगराजन एस. म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जल जीवन मिशनच्या माध्यमातून पुर्ण करावी. ही कामे पूर्ण करण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता त्वरित घ्याव्यात. पंचायत समितीनिहाय कामांचा वेळोवेळी आढावा संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी घ्यावा. डिसेंबर २०२१ अखेर बहुतांश योजनांची कामे पूर्ण होतील, या दृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्याचा समावेश आकांक्षीत जिल्हा म्हणून करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा आणि अंगणवाड्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. जल जीवन मिशन अंतर्गत रेट्रो फिटिंगची कामे वेळेत पुर्ण करावीत.’’  ग्रामपंचायतींचे आराखडे तयार साळुंके माहिती देताना म्हणाले, सर्व ग्रामपंचायतीअंतर्गत ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६८० गाव वाड्या-वस्त्यापैकी संबंधित ग्रामपंचायतमार्फत २१४ गाव कृती आराखडे तयार करण्यात आले आहे. जल जीवन मिशनअंतर्गत ५५२ योजना ६५२ गावांसाठी आराखडा सन २०२१-२०२२ मध्ये मंजूर करण्यात आला आहे. या वर्षात ५ कोटी २८ लाख रुपये प्राप्त झाले असून प्रगतीपथावरील २३ योजनांसाठी २ कोटी १५ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. २८५ गावामध्ये रेट्रो फिटिंगच्या माध्यमातून ६४ हजार १९७ कुटुंबांना नळजोडणी देण्यात येणार आहे. यातून प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com