जोरदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई कायम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : पूर्वमोसमी पावसाची ओढ, मॉन्सूनच्या पावसाला झालेला उशीर आणि जोरदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई कायम आहे. जिल्ह्यातील १३ पैकी १२ तालुक्यांना टंचाईच्या झळा बसत आहेत. तब्बल २१७ गावे १६४७ वाड्यांमध्ये ३३५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सहा लाखांहून अधिक नागरिकांना आणि जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील १४ हजारांहून अधिक जनावरांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

मॉन्सून दाखल होत असताना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात दमदार पाऊस पडला. मात्र दोन दिवसातच पुन्हा पाऊस थांबला. यातच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अद्याप पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही, त्यामुळे धरणांतील पाणीसाठा तळाशी असल्याने चिंता वाढल्या आहेत. टंचाई कमी होण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. बारामती तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून, तेथील ३० गावे ३५० वाड्यांना ४५ टॅंकरने तर इंदापूर तालुक्यातील ४४ गावे, २६१ वाड्यांना ६० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहेत. मात्र मावळ तालुक्यात अद्याप एकही टॅंकर सुरू करावा लागला नाही. 

जिल्ह्यात ५० टक्के पाऊस मॉन्सून उशिरा दाखल झाल्याने यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. १ जूनपासून पुणे जिल्ह्यात सरासरी केवळ ९ दिवस पाऊस पडला असून, सरासरी ७० मिलिमीटर म्हणजेच ५० टक्के पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. कोरडवाहू शिरूर तालुक्यात आठ दिवस पडलेल्या पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. तेथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वेल्हे तालुक्यात सर्वांत कमी ३२ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाई कायम आहे.    

जिल्ह्यात एक जूनपासून पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
तालुका सरासरी पडलेला टक्केवारी दिवस
हवेली १०७.४ ६४.३ ५९.९
मुळशी २३५.३ ९४.६  ४०.२  १०
भोर  १३८.९ ६३.२ ४५.५
मावळ   १८७.६ ७८.१  ४१.६  ६
वेल्हे   ४१७.२  १३४.५  ३२.२ १३
जुन्नर १००.९  ५१.२ ५०.७
खेड  १०३.४ ७२.४  ७०
आंबेगाव ११२.७ ९८.६ ८७.५
शिरूर  १०६.९ १०७.२ १००.३
बारामती ७८.५ २८.६  ३६.४
इंदापूर  ९२.२ ४१.४ ४४.९
दौंड  ८१.५   ६१.६  ७५.६
पुरंदर   ८८.७  ७०.४  ७९.४ 
बुधवारपर्यंत (ता.२६) तालुकानिहाय पाणीटंचाई स्थिती :
तालुका गावे वाड्या टॅंकर
आंबेगाव  २४ ७३ ३०
बारामती ३० ३५० ४५
भोर  
दौंड  २२  १५० ३३
हवेली १२ ३० १५
जुन्नर २५ १८९ २८
खेड २१  १९२ २६
मुळशी ४   ० 
पुरंदर १७  २४१ ३६
शिरूर  १२ १५३  ४४
वेल्हा ० 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com