काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा 

आंबा, काजू बागायतदारांना मिळालेली अत्यल्प नुकसानभरपाई आणि न मिळालेल्या विमा परतावा, या दोन विषयांवरून आंबा, काजू बागायतदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशाराA warning of agitation from cashew, mango growers
काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशाराA warning of agitation from cashew, mango growers

सिंधुदुर्गनगरी : आंबा, काजू बागायतदारांना मिळालेली अत्यल्प नुकसानभरपाई आणि न मिळालेल्या विमा परतावा, या दोन विषयांवरून आंबा, काजू बागायतदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गरज भासल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काजू, आंबा बागायतदारांनी सभेत दिला.  वेंगुर्ला येथील फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आंबा, काजू बागायतदार शास्त्रज्ञ विचार मंचची बैठक जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला विलास ठाकूर, हनमुत आंगवेकर, दीपक नाईक, रत्नदीप धुरी, उत्तम वालावलकर, विवेक कुबल, प्रकाश डिचोलकर, गजानन वेंगुर्लेकर, ऐश्वर्य चमणकर आदी उपस्थित होते.  तौक्ते चक्रवादळात नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती. दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा होती. परंतु प्रत्यक्षात हेक्टरी १८ हजार देण्याचा घाट कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी घातला आहे. तशा स्वरूपाचे पंचनामे करण्यात आले आहेत. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून, आम्ही तो सहन करणार नाही, अशी भूमिका आंबा, काजू बागायतदारांनी घेतली आहे. या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी फळ संशोधन केंद्रात बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी करण्यात आली. येत्या काही दिवसांत तौक्तेची अपेक्षित नुकसानभरपाई आणि आंबा, काजू विमा परतावा मिळाला नाही तर आंदोलनाची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल, असा इशारा बागायतदारांनी प्रशासनाला दिला आहे. या शिवाय शेतकरी वापरत असलेल्या कीटकनाशकांसाठी शासनाने ५० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी देखील सभेत शेतकऱ्यांनी केली. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com