कृषी सहायक संघटनेच्या वर्धा जिल्हा ध्यक्षपदी रंजना वानखडे

महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेची वर्धा जिल्हा कार्यकारणी निवडणीसाठीची त्रैवार्षिक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत वर्धा जिल्हा अध्यक्ष म्हणून रंजना वानखडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Wardha district of Krishi Sahayak Sanghatana Ranjana Wankhade as President
Wardha district of Krishi Sahayak Sanghatana Ranjana Wankhade as President

वर्धा ः महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेची वर्धा जिल्हा कार्यकारणी निवडणीसाठीची त्रैवार्षिक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत वर्धा जिल्हा अध्यक्ष म्हणून रंजना वानखडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून राहुल देशमुख यांची, तर सचिवपदी नीतेश कोठेकर यांची निवड करण्यात आली.  कृषी सहायक हे कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमध्ये दुवा म्हणून काम करतात. अशातच कृषी सहायकांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ म्हणून संघटना जबाबदारी पार पाडते. त्यानुसार वर्धा जिल्हा कृषी सहायक संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. यामध्ये महिला राज्य प्रतिनिधी म्हणून रीना भगत, तर कार्याध्यक्ष म्हणून मोईन शेख यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून अनुप गुडवार, हर्षल चौधरी व संतोष पाटील, जिल्हा खजिनदार समीर खोंडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश देशमुख, जिल्हा महिला प्रतिनिधी वंदना खैरकार, जिल्हा संघटक सुशील महाकाळकर व पंकज लांडे यांचा समावेश आहे. संपूर्ण कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नागपूर येथील राज्य कार्यकारिणी सदस्य गजभिये यांनी कामकाज पार पाडले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com