येरळा नदी कोरडी पडल्याने द्राक्ष बागा संकटात

बागायत शेती वाचविण्यासाठी कण्हेर धरणातील आरफळ योजनेचे किंवा ताकारी योजनेचे पाणी हे निमणी येथील बंधारा पूर्णपणे भरेपर्यंत येरळा नदीत सोडण्याची मागणी येरळाकाठावरील शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.
Vineyards in crisis as Yerla River dries up
Vineyards in crisis as Yerla River dries up

सांगली ः तासगाव पश्‍चिम भागास वरदान ठरत असलेली व बारमाही झालेली येरळा नदी सध्या ऐन उन्हाळ्यात कोरडी पडल्याने राजापूर, तुरची, ढवळी व निमणी परिसरातील संपूर्ण येरळाकाठची ऊसशेती व द्राक्ष बागा पाण्याविना धोक्‍यात आल्या आहेत. बागायत शेती वाचविण्यासाठी कण्हेर धरणातील आरफळ योजनेचे किंवा ताकारी योजनेचे पाणी हे निमणी येथील बंधारा पूर्णपणे भरेपर्यंत येरळा नदीत सोडण्याची मागणी येरळाकाठावरील शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

या नदीवर निमणी व वसगडे येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. निमणी बंधाऱ्यात तेरा फूट उंचीचा जलसाठा करण्याची सोय असून या बंधाऱ्याची साठवण क्षमता २७ दशलक्ष घनफूट आहे. या जलसाठ्यावर मंजूर क्षेत्र २१५ हेक्‍टर आहे. गेल्या वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने व एकदा आरफळ योजनेचे पाणी सोडल्याने निमणी व वसगडे येथील दोन्ही बंधारे वेळेत भरल्याने येरळा नदीकाठचा रब्बी हंगाम यशस्वी होऊ शकला. परंतु गेल्या दोन महिन्यापासून येरळा कोरडी पडली असल्याने व निमणी येथील बंधारा कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, येरळाकाठ परिसरातील सर्व विहिरी व कूपनलिकेतील पाणी पातळी खाली गेल्याने संपूर्ण बागायत शेती धोक्‍यात आली आहे.

निमणी बंधाऱ्याच्या परिसरातच द्राक्षबागा व ऊस शेतीचे प्रमाण लक्षणीय आहे. सध्या या परिसरातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असून, या बागांची खरड छाटण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. या काळात द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्‍यकता असते. अशा वेळेस द्राक्ष बागांना पाणी न मिळाल्यास पुढील द्राक्ष हंगाम धोक्‍यात येणार आहे. सदर द्राक्ष बागा व इतर बागायत शेती वाचविण्यासाठी पाटबंधारे विभागाने निमणी व वसगडे येथील बंधारे पूर्णपणे भरेपर्यंत पाणी सोडण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com