वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या  २२ संचालकांची निर्दोष मुक्तता 

देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा पाटील साखर कारखान्याच्या बावीससंचालकांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.निर्यातदाराने साखर निर्यात करण्याऐवजीदेशांतर्गत बाजारात विकून कारखान्याचे नुकसान केले होते.
वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या  २२ संचालकांची निर्दोष मुक्तता Vasantdada Cooperative Sugar Factory Innocent release of 22 directors
वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या  २२ संचालकांची निर्दोष मुक्तता Vasantdada Cooperative Sugar Factory Innocent release of 22 directors

नाशिक : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा पाटील साखर कारखान्यातील संचालक मंडळाने निर्यातीसाठी साखर ५५ हजार क्विंटल साखर दिली होती. मात्र निर्यातदाराने देशांतर्गत बाजारात विकून कारखान्याचे नुकसान केल्याप्रकरणी निर्यातदार व तत्कालीन संचालक मंडळावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामधील सर्व २२ संचालकांची सटाणा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.      वसंतदादा पाटील साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने केंद्र सरकारच्या परवानगीने ५५ हजार क्विंटल साखर निर्यातीसाठी निर्यातदार  व्यापाऱ्याला विकली होती. मात्र ही साखर निर्यातदाराने  देशांतर्गत विकून १ कोटी रुपयापेक्षा अधिक नफा कमावला. या बाबत तक्रार झाल्याने शासनाच्या वतीने व्यापारी आणि तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी साखर नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार सटाणा न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन सटाणा न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम आव्हाड यांच्या न्यायालयात झाली. त्यांनी या खटल्यात गुरुवार (ता. १६) रोजी सर्व २२ आरोपींची पुराव्याअभावी  निर्दोष मुक्तता केली. माजी आरोग्यमंत्री दिवंगत डॉ. दौलतराव आहेर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कार्यरत असताना हे वादग्रस्त प्रकरण उद्भवले होते. हा खटला सन २००८ पासून सटाणा न्यायालयात सुरू होता. दरम्यानच्या काळात डॉ. दौलतराव आहेर व इतर ४ संचालकांचे निधन झाले. तब्बल १२ वर्षे  चाललेल्या या खटल्यात कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या चारही तालुक्यातील प्रमुख नेते डॉ. दौलतराव आहेर, पोपटराव वाघ, विश्वासराव देवरे, नारायण पाटील, मंजुळाबाई पगार, तुळशीराम बिरारी, सुधाकर पाटील, शशिकांत पवार, संतोष मोरे, धनसिंग वाघ, फुला जाधव, बाजीराव पवार आदी संचालकसह साखर विभागाकडील अधिकारी व कर्मचारी आरोपी करण्यात आले होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com