सिंधुदुर्गच्या वैभववाडी, फोंडा भागासाठी चारोळी योजना

जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील फोंडा परिसरात मोठ्या प्रमाणात चारोळीचे उत्पादन मिळते. या चारोळीला प्रक्रिया उद्योगात आणण्यासाठी योजना तयार करण्यात आली असल्याची माहिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत दिली.
For Vaibhavwadi, Fonda area of Sindhudurg Charoli scheme
For Vaibhavwadi, Fonda area of Sindhudurg Charoli scheme

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील फोंडा परिसरात मोठ्या प्रमाणात चारोळीचे उत्पादन मिळते. या चारोळीला प्रक्रिया उद्योगात आणण्यासाठी योजना तयार करण्यात आली असल्याची माहिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत दिली.  जिल्हा परिषद कृषी समितीची या पंचवार्षिकमधील अखेरची सभा दोडामार्ग तालुक्यातील सुशीला हॉलमध्ये झाली. या सभेला रणजित देसाई, संजय देसाई, सुधीर नकाशे, सावी लोके, सायली सावंत, मनस्वी घारे, डॉ. दिलीप शिंपी, सुधीर चव्हाण, मिलिंद जाधव आदी उपस्थित होते.  वैभववाडी आणि फोंडा परिसरात मोठ्या प्रमाणात चारोळी उत्पादन घेतले जाते. परंतु ती फोडण्याची मशिन्स उपलब्ध नसल्यामुळे चारोळी मोठ्या प्रमाणात वाया जाते.चारोळीला प्रक्रिया उद्योगात आणण्यासाठी योजना तयार करण्यासंदर्भात मागील सभेत सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता योजना तयार करण्यात आली असल्याची माहिती श्री. म्हापसेकर यांनी सभागृहात दिली.  वणवा अनुदानातर्गंत जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव समितीकडे प्राप्त झाले आहेत.आणखी काही प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.२५ मार्चपर्यंत येणाऱ्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल, असे सभेत स्पष्ट करण्यात आले. या योजनेअंतर्गत वणवाग्रस्तांना हेक्टरी १२ हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाते. पशुसंवर्धन समिती सभेत निश्‍चित केलेली तलंग योजना रद्द करून त्यासाठी तरतूद करण्यात आलेले १७ लाख रुपये अन्य योजनांसाठी वळविण्यात निर्णय सभेत घेण्यात आला. यापैकी ६ लाख रुपये दुधाळ जनावरांसाठी, २ लाख रुपये फॅट मशिनसाठी, तर ९ लाख रुपये अन्य योजनांसाठी वापरण्यात येणार आहेत. मागील तीन महिन्यांत १८० दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठीचे अनुदान लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्यात आले आहेत    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com