अमेरिकेत चौघांवर लसीची चाचणी; संशोधनातील पहिला टप्पा वेगात

अमेरिकेत चौघांवर लसीची चाचणी; संशोधनातील पहिला टप्पा वेगात
अमेरिकेत चौघांवर लसीची चाचणी; संशोधनातील पहिला टप्पा वेगात

वॉशिंग्ट ः अमेरिकेत कोरोना व्हायरसवरील (कोविड -१९) लसीसाठी चाचणी सुरू झाली असून, चार निरोगी व्यक्तींच्या हातावर याची पहिली लस सोमवारी (ता. १६) टोचण्यात आली. ‘कैसर पर्मनेंटी वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (केपीडब्ल्यूएचआरआय) या संस्थेतील सिएटल येथील केंद्रात औषधावर संशोधन सुरू आहे. यापूर्वी कोरोना विषाणूवरील लसीसाठी मानवावर चाचणी घेण्यात आलेली नाही. संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी प्रथमच चौघांना ही लस देण्यात आली. चाचणीसाठी संस्थेने नागरिकांना आवाहन केले आहे. ३ मार्चपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उगम प्रथम झाला असला, तरी आता त्याचा प्रसार जगभरात झाला असल्याने अत्यंत कमी वेळेत याची लस तयार करण्याचे आव्हान संशोधकांसमोर असून ‘केपीडब्ल्यूएचआरआय’मधील चाचणीच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता आहे. ‘अशा आणीबाणीच्या काळात काय करता येईल ते करण्याची संस्थेतील प्रत्येकाची इच्छा आहे,’ असे कैसर पर्मनेंटी अभ्यास गटाच्या प्रमुख डॉ. लिसा जॅकसन यांनी सांगितले. या संशोधन मोहिमेत कोरोनावरील लस टोचून घेणारी पहिली सहभागी महिला जेनिफर हॉलर (वय ४३) ही तंत्रज्ञान क्षेत्रातील एका लहान कंपनीत कार्य व्यवस्थापक या पदावर काम करते. ‘कोरोना व्हायरसमुळे हतबल झाल्याचे आम्हाला वाटत होतो. पण, यासंबंधी काही करण्याची संधी मला या चाचणीद्वारे मिळाली. मला खूप छान वाटत आहे,’ असे हॉलर हिने लस टोचल्यावर सांगितले. या अभ्यासात आई सहभागी झाल्याचा आनंद तिच्या दोन कुमारवयीन मुलांनीही व्यक्‍त केला. तिच्यानंतर आणखी तीन जणांना ही लस टोचण्यात आली. यातील एक नील ब्रॉउनिंग (वय ४६) हा मायक्रोसॉफ्टमध्ये अभियंता आहे. ‘मी या मोहिमेत सहभागी झालो, याचा माझ्या मुलीला अभिमान वाटत आहे,’ असे त्याने सांगितले. या संशोधनात स्वयंफूर्तीने सहभागी झालेल्या ४५ जणांना एका महिन्याच्या कालावधीत दोन डोस देण्यात येणार आहेत. ‘‘संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात या लसीची सुरक्षितता आणि तिचा प्रभाव यातून तपासण्यात येणार आहे,’’ अशी माहिती ‘यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट’चे डॉ. ॲन्थोनी फाउसी यांनी दिली. कोरोना व्हायरसच्या लसीवर एवढ्या कमी वेळेत संशोधन केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक केले आहे. कोरोना व्हायरसवर औषध शोधण्यासाठी हे एकमेव संशोधन नाही. अमेरिकेसह जगभरात यावर संशोधन सुरू आहे. ‘इनोव्हिओ फार्मास्युटिकल’ या कंपनीतर्फे पुढील महिन्यात अमेरिका, चीन आणि दक्षिण कोरियात या विषयावर अभ्यास सुरू होण्याची शक्यता आहे. लसीबद्दल...

  •   ‘mRNA-1273’ असे सांकेतिक नाव
  •   सहभागींना संसर्गाची लागण होण्याची शक्यता नाही. कारण, त्यांना दिलेल्या लसीमध्ये कोरोना विषाणूचा समावेश नाही
  •   या संशोधनाच्या चाचणीसाठी निवड केलेल्या १८ ते ५५ वर्षांच्या व्यक्तींना लसींची मात्रा जास्त देणार
  •   या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते का, याचे निरीक्षण करण्यासाठी रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करणार व त्याचे दुष्परिणामही तपासणार
  •   यातील सहभागींना प्रत्येक भेटीसाठी १०० डॉलर मोबदला मिळणार
  • ‘केपीडब्ल्यूएचआरआय’च्या या संशोधनाचे निष्कर्ष सकारात्मक आले, तरी ही लस १२ ते १८ महिन्यांनंतरच सर्वांना उपलब्ध होऊ शकेल. — डॉ. ॲन्थोनी फाउसी,  संशोधक, यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट

    Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
    Agrowon
    agrowon.esakal.com