

सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामासाठी उडीद व मूग हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाले आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
राऊत म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांपासून बार्शी बाजार समितीत उडीद आणि मूगाची आवक वाढली आहे. पण, दर कमी मिळतो आहे. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन आपण हे केंद्र मंजूर केले. सध्या उडदाला हमीभाव ६३०० रुपये व मूगाला ७१०० रुपये आहे. परंतु, ज्यादा आवक झाल्याने सध्या उडदाला बाजारात ४००० ते ५५०० रुपये आणि मूगाला ५००० ते ६००० रुपये दर मिळत आहेत. त्यासाठी हे केंद्र सुरु व्हावे, यासाठी आपला आग्रह होता.
बार्शी तालुक्यात यंदा सर्वाधिक उडदाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. सध्या या केंद्रासाठी तुळजा भवानी कृषी व साधन पुरवठा सहकारी संस्था मर्यादित उंबर्गे (ता. बार्शी) यांची नेमणूक करण्यात आली आहे. हंगाम २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी करताना पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करावयाची आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड, सातबारा उतारा, पीक पेरा, बॅंकेचे पासबूक ही कागदपत्रे आवश्यक आहेत. १५ सप्टेंबरपासून प्रत्यक्षात नोंदणीही सुरु झाली आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.