

नागपूर : राज्यात आजवर हळदीची ढोबळमानाने सरासरी क्षेत्राचीच नोंद होत होती. आयुक्तालयाच्या सूचनेनंतर प्रत्यक्ष बांधावरील क्षेत्राची नोंद घेण्यात आल्याने ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हळद लागवडीत महाराष्ट्र देशात यंदा अव्वल ठरला आहे. या पूर्वी ५६ हजार हेक्टर लागवड क्षेत्राच्या माध्यमातून तेलंगणा पहिल्या स्थानी होते. या वर्षी कमी उत्पादकतेच्या परिणामी हळदीच्या दरात तेजी अनुभवली जात आहे. परिणामी, हळद उत्पादकता क्षेत्र आणि त्या भागातील शेतकरी चर्चेत आले आहेत. त्या सोबतच आता लागवड क्षेत्रात आघाडी घेतल्याने महाराष्ट्रदेखील देशपातळीवर चर्चेच्या अग्रस्थानी आला आहे. हळद उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील हिंगोली, परभणीसह सांगली, सातारा तसेच विदर्भातील वाशीम, भंडारा, गोंदिया भागांत हळद लागवड होते. देशात २३ राज्यांमध्ये हळद होते. जम्मू ते कन्याकुमारी अशा सर्वच भागांत हळद होते. बर्फवृष्टी होणारा श्रीनगरचा काही भागांचा अपवाद वगळता देशातील सर्वच राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हळद होते.
महाराष्ट्रात या पूर्वी ढोबळमानाने हळदीची नोंद कृषी विभागाकडून घेतली जात होती. दर वर्षी मागच्या पानावरून पुढेचा कित्ता गिरवित सरासरी १० ते १२ हजार हेक्टर, असे हळद लागवड क्षेत्र दर्शविण्यात येत होते. २०१९-२० मध्ये १८ हजार हेक्टर क्षेत्र राज्यात दाखविण्यात आली. हळद उत्पादक भागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना वैयक्तिकस्तरावर विचारणा केली. त्या वेळी ५६ हजार हेक्टरपर्यंत त्यात आश्चर्यकारक वाढ नोंदविली गेली. याची गंभीर दखल घेत कृषी आयुक्तालयाकडून इतर पिकांप्रमाणेच हळदीच्या नोंदी घेण्याच्या सूचना सर्वच जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. सहाव्या स्थानावरून थेट पहिल्या क्रमांकावर ११ हजार ७५६ हेक्टर इतके अत्यल्प क्षेत्र असल्याने महाराष्ट्र हळद उत्पादनात सहाव्या स्थानावर होता. हळद लागवडीत या पूर्वी आंध्र प्रदेशची मक्तेदारी होती. त्यापासून तेलंगणा विभक्त झाल्यानंतर तेलंगणांमध्ये गेल्या वर्षी ५६ हजार ५८९ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होती. महाराष्ट्रात नोंद घेण्यास सुरुवात झाल्यानंतर २०१९-२०मध्ये हळद लागवड क्षेत्र ५४ हजार ८८५ हेक्टरवर पोहोचले आता थेट ८४ हजार हेक्टर क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र देशात हळद लागवडीत अव्वल ठरला आहे. - उत्पादकतेत दुसऱ्या स्थानी लागवड क्षेत्रात महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र २६.१ टन प्रति हेक्टर उत्पादकतेच्या माध्यमातून बिहार पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राची उत्पादकता २०.३ टन प्रति हेक्टर असून, उत्पादकतेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.
प्रतिक्रिया
हळदीची लागवड २००८पर्यंत सरी वरंब्यावर लागवड होत होती. त्यामुळे उत्पादकता कमी होती. त्यानंतर गादी वाफ्यावर, फर्टिगेशन, ठिबक सिंचन अशा व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब होऊ लागला. त्यामुळे उत्पादकतेत वाढ झाली आहे. बिहार नंतर महाराष्ट्राची उत्पादकता सर्वाधिक आहे. लागवड क्षेत्र नोंदीबाबतही आता धोरण बदलण्यात आले. परिणामी, लागवड क्षेत्र ८४ हजार हेक्टरवर पोहोचले आहे; त्यामुळे देशात महाराष्ट्र हळद लागवडीत अग्रस्थानी ठरला आहे. -जितेंद्र कदम, हळद तज्ज्ञ - जिल्हानिहाय्य लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये) - हिंगोली ४९ हजार ७६४ - नांदेड १३ हजार १३१ - वाशीम ४ हजार १४९ - यवतमाळ ३ हजार ७३६ - परभणी ३ हजार १५१ - सातारा १७८८ - बुलडाणा - १७६३ - जालना १०७७ - जळगाव ९८४ - चंद्रपूर ७८७ - सांगली - ७७४ - गोंदिया ३८२ - भंडारा ३७५ - नागपूर ३५१ - इतर जिल्हे १८५४ एकूण : ८४ हजार ०६६ -
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.