सौरऊर्जेने पिकाला वेळेवर पाणी

सोलापूर ः राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा पुरविण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच व ७.५ अश्‍वशक्तीचे सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.
Timely watering of the crop by solar energy
Timely watering of the crop by solar energy

सोलापूर ः राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा पुरविण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच व ७.५ अश्‍वशक्तीचे सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सर्व शेतकऱ्यांना दिवसा विनाव्यत्यय वीजपुरवठा उपलब्ध झाला आहेच. या शिवाय त्यांची वीजबिलांतूनही मुक्तता झाली  आहे.

महावितरणने प्रामुख्याने कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सौर कृषिपंप योजना सुरू केली आहे. पारंपरिक पद्धतीने कृषिपंपाची वीजजोडणी न झालेले व महावितरणकडे वीजजोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून पारेषणविरहित नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. तसेच अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.

त्यासाठी सौर कृषिपंपाच्या आधारभूत किमतीपैकी सर्वसाधारण गटासाठी १० टक्के, तर अनुसूचित जाती/जमाती गटातील शेतकऱ्यांसाठी ५ टक्के लाभार्थी हिस्सा आहे. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत एक लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातून आतापर्यंत २ लाख ४० हजार ६१७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ९७ हजार ९ लाभार्थ्यांनी मागणी पत्राचा (डिमांड नोट) भरणा केला आहे. तर ९६ हजार १९१ लाभार्थ्यांनी स्वतः निवडसूचीतील संबंधित पुरवठादारांची निवड केली आहे. त्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप पुरवण्यात आले आहेत. 

देखभाल खर्च शून्य

वीजयंत्रणेचे जाळे नसल्यामुळे व पारेषणविरहित असल्याने सौर कृषिपंपांद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. यासोबतच शेतकऱ्यांची वीजबिलातून मुक्तता झाली आहे. आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषिपंपासाठी ५ वर्षे व पॅनेलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखभालीचा खर्च देखील शून्य आहे. 

इथे करा संपर्क

या योजनेची सर्व माहिती महावितरणच्या https://www.mahadiscom.in/solar/ या स्वतंत्र पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जाची सद्यःस्थिती ऑनलाइन उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक टप्प्यावर त्याबाबत अर्जदारांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com