तीन लाख शेतकऱ्यांची वीजबिले कोरी

कृषिपंप वीज धोरणाच्या अंमलबजावणीसाठी १ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत ‘कृषी ऊर्जा पर्वा’च्या आयोजनास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
तीन लाख शेतकऱ्यांची वीजबिले कोरी Three lakh farmers paid their electricity bills
तीन लाख शेतकऱ्यांची वीजबिले कोरी Three lakh farmers paid their electricity bills

कोल्हापूर : कृषिपंप वीज धोरणाच्या अंमलबजावणीसाठी १ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत ‘कृषी ऊर्जा पर्वा’च्या आयोजनास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऊर्जा विभागाच्या कृषी धोरणाला प्रतिसाद देत सहभागी झालेल्या १२ लाख १५ हजार शेतकऱ्यांची वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी वाटचाल सुरू झाली असून, प्रत्यक्षात २ लाख ९२ हजार शेतकऱ्यांची कृषी वीजबिले संपूर्णपणे कोरी झाली आहेत.

यासोबतच एकूण थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत सवलत मिळवीत शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसाठी ११८४ कोटी रुपयांचा भरणा देखील केला आहे. राज्यातील ३४ जिल्हे व ग्रामपंचायतींनी एकूण ६६ टक्के हक्काचा ८४५ कोटी रुपयांचा निधी मिळविला आहे. दि. १ एप्रिल २०१८ पासून प्रलंबित ४४२५० नवीन वीजजोडण्या आतापर्यंत कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 

शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्पांसोबत ११८१ मेगावॉट क्षमतेचे करार करण्यात आले आहेत. धोरणाप्रमाणे निश्‍चित केलेल्या सुधारित मूळ थकबाकीपैकी या शेतकऱ्यांनी ११८४ कोटी ३४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना निर्लेखन सूट, विलंब व व्याजातील सूट तसेच थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी अतिरिक्त सूट अशी एकूण ३७२२ कोटी ६ लाख रुपयांची थकबाकीमध्ये माफी मिळाली आहे.

यानुसार पुणे प्रादेशिक विभागात ४ लाख ७८ हजार ७५ शेतकऱ्यांनी ६१८ कोटी ८४ लाख रुपयांचा भरणा केला असून, त्यांना थकबाकीमध्ये एकूण १३२१ कोटी ५ लाख रुपयांची माफी मिळाली आहे. कोकण प्रादेशिक विभागात ३ लाख ६४ हजार २४० शेतकऱ्यांनी ३२५ कोटी ६६ लाख रुपयांचा भरणा केला असून, त्यांना थकबाकीमध्ये ११२९ कोटी ८९ लाख रुपयांची माफी, तर औरंगाबाद प्रादेशिक विभागात २ लाख ६६ हजार ६० शेतकऱ्यांनी १४४ कोटी ६७ लाख रुपयांचा भरणा केला असून, त्यांना ११०४ कोटी १४ लाखांची माफी आणि नागपूर प्रादेशिक विभागात १ लाख ६ हजार ५७६ शेतकऱ्यांनी ९५ कोटी १८ लाख रुपयांचा भरणा केला असून, त्यांना थकबाकीमध्ये १६६ कोटी ९८ लाख रुपयांची माफी मिळाली आहे.

कोल्हापुरातील ६ गावे संपूर्ण थकबाकीमुक्त आतापर्यंत राज्यातील तब्बल २ लाख ९२ हजार ३८१ शेतकरी वीजबिलांतून थकबाकीमुक्त झाले आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी चालू वीजबिलांचे ११८ कोटी २५ लाख आणि सुधारित मूळ थकबाकीचे ५० टक्के म्हणजे ४१६ कोटी ९३ लाख अशा एकूण ५३५ कोटी १८ लाख रुपयांचा भरणा केला आहे व थकीत वीजबिले संपूर्णपणे कोरे केले आहे. सुधारित मूळ थकबाकीची ५० टक्के रक्कम भरल्यानंतर या शेतकऱ्यांना उर्वरित ५० टक्के म्हणजे ४१६ कोटी ९३ लाख रुपये माफ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ६ गावांतील १३५ शेतकऱ्यांनी सुधारित मूळ थकबाकीचा ५० टक्के भरणा करून संपूर्ण गावाला कृषी वीजबिलातून १०० टक्के थकबाकीमुक्त केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com