नाशिकच्या उत्तरपूर्व भागात टँकर सुरू

नाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला. मात्र आता अनेक भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत.
Tanker start in northeastern part of Nashik
Tanker start in northeastern part of Nashik

नाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला. मात्र आता अनेक भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत चालु वर्षी एप्रिलच्या सुरवातीलाच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उत्तरपूर्व भागात देवळा, चांदवड व येवला तालुक्यातील ३५ गावे व वाडी-वस्त्यांवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून १५ टँकर सुरू करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यातील पश्चिम भागात पर्जन्यमान अधिक असले तरी पाऊस कमी आहे. त्यामुळे या भागात एक मीटरपर्यंत भूजल पातळीत घट आहे. मात्र अद्याप या भागात टँकर सुरू नाहीत. उत्तरपूर्व भागात चालू वर्षी पर्जन्यमान चांगले झाले. मात्र उपसा वाढल्याने अनेक भागात विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे देवळा, चांदवड व येवला तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. 

येवला तालुक्यातील पूर्व भागात डिसेंबरनंतर पाणी उपसा वाढला. त्यामुळे विहिरी खोल जाण्यास सुरवात झाली आहे. समाधानकारक पाऊस होऊनही आता उशिरा टंचाई भासत आहे. मात्र काही भागात पाणीटंचाई वाढत असल्याने पुन्हा एकदा टँकर फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. 

येवल्यात पाणीप्रश्न गंभीर  

जिल्ह्यात सर्वाधिक १३ टँकर येवला तालुक्यात ३१ ठिकाणी सुरू झाले आहेत. ज्यामध्ये ममदापूर, खरवंडी, देवदरी, तळवाडे, आहेरवाडी, गोरखनगर, कोळगाव, वाई बोथी, आडसुरेगाव, रेंडाळे, कोळम, वसंतनगर, भुलेगाव, अंकाई, नगरसुल, कासारखेडे, देवठाण, खामगाव, चांदगाव, पन्हाळसाठे, भायखेडा, पिंपळखुंटे या गावांसह इतर वाडी-वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. तर अजूनही हे संकट वाढण्याची शक्यता आहे. 

गेल्या दीड महिन्यांपूर्वी पाण्याची टंचाई तीव्र झाली. त्यामुळे गावातील विहिरी व हातपंपांना पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्यासह इतर वापरासाठी अडचण होती. त्यासाठी टँकर सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव पाठविला होता. आता टँकर सुरू झाले आहेत. यावर्षी   लवकर संकट आले आहे. - गोकूळ सानप, सामाजिक कार्यकर्ते, कोळगाव, ता. येवला. 

सध्या जिल्ह्याच्या पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे दाहकता वाढली आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी टँकर मंजूर झाल्याने दिलासा मिळाला. मात्र पाणी टंचाई वाढत असल्याने विहिरी अधिग्रहीत केल्या होत्या. मात्र त्यातील पाणी संपत आहे.  - प्रवीण गायकवाड, सभापती-पंचायत समिती, येवला.  

टँकर स्थिती अशी

तालुके गावे  वाड्या सुरू टँकर लोकसंख्या
देवळा ४,३३९
चांदवड १  १   २,९९३
येवला २०   ११ १३ ३०,९७४
एकूण २४  ११ १५ ३८,३०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com