सिंदखेडराजा तालुक्यात दोनशे हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन

सिंदखेडराजा तालुक्यात ३५ गावांत १७५ हेक्टरवर पेरणी झालेली असून पीक चांगले जुळून आले आहे.
Summer soybean on 200 hectares in Sindkhedraja taluka
Summer soybean on 200 hectares in Sindkhedraja taluka

साखरखेर्डा, जि. बुलडाणाः या परिसरात यंदा उन्हाळी सोयाबीनची मोठ्या क्षेत्रावर लागवड झाली होती. सिंदखेडराजा तालुक्यात ३५ गावांत १७५ हेक्टरवर पेरणी झालेली असून पीक चांगले जुळून आले आहे.  खरीप हंगामात सोयाबीनच्या उत्तम व शुद्ध बियाणांची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही बियाण्याची तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. तालुक्यातील ३५ गावांतील २२५ शेतकऱ्यांनी जवळपास१७५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. सध्या हे सोयाबीन अनेक ठिकाणी फुलोऱ्याच्या अवस्थेत तर अनेक ठिकाणी शेंगा धरलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. २२५ शेतकऱ्यांनी पेरलेल्या क्षेत्रातून एकरी ५ ते ८ क्विंटल उत्पादन येण्याची शक्यता गृहित धरली तरी दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीन उपलब्ध होणार आहे.  या बियाणांच्या आधारे आगामी हंगामात बियाणांची गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण होऊ शकेल. विशेष बाब म्हणजे या वर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे पीक परिपक्व झाल्यानंतर संततधार व अवकाळी पावसामुळे सोयाबीनची प्रत बिघडली होती. शिवाय उत्पादनातही घट आली. नेहमीचे सरासरी उत्पादनही मिळाले नाही. विविध सोयाबीनच्या बिजोत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे सोयाबीन प्लॉट ही अति पावसामुळे नुकसानग्रस्त झाले होते. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन हेखरिपातीलल प्रमुख पीक असून सोयाबीनचा पेरा मोठ्या क्षेत्रावर केला जातो. परिणामी येणाऱ्या २०२२/२३ च्या खरीप हंगामात सोयाबीनच्या शुद्ध व प्रमाणित बियाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सिंदखेडराजा तालुका कृषी विभागाने पुढाकार घेत जनजागृती केली. गावागावात कृषी सेवक, कृषी सहायक, मंडळ अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता करण्यात आली. त्यामुळे सोयाबीनची लागवड वाढली. 

शेतकरी उद्योजक व्हावा. शेतकऱ्यांनी घरच्या शेतातच बियाणे तयार करून घरीच बीज प्रक्रिया करून वापरावे असे नियोजन आहे. शेती किफायतशीर कशी होईल यासाठी कृषी विभाग क्षेत्रीय स्तरावर कार्यरत आहे. कृषी विभागाच्या सततच्या जनजागृती मोहिमेचा हा दृश्य परिणाम आहे.  - वसंतराव राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा, जि. बुलडाणा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com