उन्हाळा, रमजानमुळे टरबुजाला मागणी

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या संचारबंदीचा फटका एकाच दिवसांत बसायला सुरुवात झाली आहे. व्यापारी टरबुजाची खरेदी ५० ते १०० रुपये कमी दराने मागत आहेत.
उन्हाळा, रमजानमुळे टरबुजाला मागणी Summer, due to Ramadan Demand for watermelon
उन्हाळा, रमजानमुळे टरबुजाला मागणी Summer, due to Ramadan Demand for watermelon

अकोला : उन्हाचा तडाखा वाढत चालला असल्याने बाजारपेठेत टरबुजाची मागणी वधारत होती. शिवाय बुधवारपासून (ता. १४) रमजान महिना सुरू झाल्याने मागणी आणखी वाढेल, अशी शक्यता होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या संचारबंदीचा फटका एकाच दिवसांत बसायला सुरुवात झाली आहे. व्यापारी टरबुजाची खरेदी ५० ते १०० रुपये कमी दराने मागत आहेत. 

उन्हाळ्यात दर वर्षी टरबुजाची मागणी वाढत असल्याने शेतकरी या कमी दिवसात येणाऱ्या पिकाच्या लागवडीकडे वळाले आहेत. गेल्या वर्षात लॉकडाउनमुळे टरबूज विक्रीला मोठा फटका बसला होता. दर अवघे ४००पासून तर ६०० रुपयांपर्यंत होते. शेतकऱ्यांना विक्री सुद्धा करताना अडचणी आल्या होत्या. यंदा परिस्थिती सुधारल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा लागवड वाढवली. यंदाच्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर दर चांगले मिळत आहेत. आता उन्हाचा चटका वाढला. सध्याच्या काळात ७०० ते ९५० दरम्यान दर मिळत होते. उत्कृष्ट फळे तर हजार रुपये क्विंटलने विकत होती.

रमजान महिना लागल्याने त्यात आणखी वाढच होईल, अशी अपेक्षा लागलेली होती. मात्र, मंगळवारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केल्याने एकाच दिवसांत ५० ते १०० रुपये कमी दरांनी व्यापारी मागणी करू लागले आहेत. यामागे संचारबंदीचे कारण दिले जात आहे. येत्या काळात आणखी दर कमी होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. बुधवारी ७०० ते ९०० रुपयांदरम्यान टरबूज मागितले जात होते.

जिल्ह्यातील टरबूज स्थानिक दलालांच्या माध्यमातून उत्तरेकडील व्यापारी खरेदी करीत आहेत. काश्‍मीर, दिल्ली, सिलीगुडी तसेच उत्तरेकडील इतर राज्यात टरबूज पाठविले जात आहे. दक्षिणेतील काही राज्यातही फळे जाऊ लागली आहेत.

प्रतिक्रिया संचारबंदी झाल्यानंतर व्यापारी एका रात्रीतून टरबूज ५० ते १०० रुपये प्रतिक्विंटल दराने कमी मागत आहेत. हजार रुपयांपर्यंत पोहोचलेला दर ९०० ते ९५० पर्यंत खाली आला आहे. पुढील काळात हा दर व्यापारी आणखी किती खाली उतरवितात हे सांगता येत नाही.  -अनंत इंगळे, ट रबूज उत्पादक, चितलवाडी, ता. तेल्हारा जि. अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com