केळीदराची जोरदार मुसंडी; पंधरवड्यात दुपटीने वाढ

ओमिक्रॉनचे सावट दूर होत असल्याचा फायदा केळीला होत आहे. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत केळी दराने दुप्पट उसळी मारली आहे. राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये केळीला टनाला १५००० ते १६००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
A strong push of bananas; Doubled in a fortnight
A strong push of bananas; Doubled in a fortnight
Published on
Updated on

कोल्हापूर : ओमिक्रॉनचे सावट दूर होत असल्याचा फायदा केळीला होत आहे. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत केळी दराने दुप्पट उसळी मारली आहे. राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये केळीला टनाला १५००० ते १६००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. 

पंधरवड्यापूर्वी केवळ ५००० ते ६००० रुपये इतकेच दर होते. महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात शीत गृहचालकाकडून केळी साठवणुकीला प्राधान्य दिले जात आहे. केळीची चणचण भासत असल्याने दरात उच्चांकी वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत दर विक्रमी पातळीकडे जातील, अशी शक्यता आहे.  

सध्या पश्‍चिम महाराष्ट्रातील रायपनिंग चेंबर्समध्ये केळीची चणचण भासत असून, चालकांनी राज्यातील इतर भागांतील उत्पादकांकडे केळी साठवणुकीसाठी संपर्क सुरू ठेवला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये अपवादात्मकच केळी क्षेत्र असल्याने आता या भागात विक्रीसाठी राज्याच्या इतर भागातून केळी येतील, अशी शक्यता आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर केळी दरात मोठी पडझड झाली. लाखो रुपये खर्च करून केळीला अत्यल्प दर असल्याने शेतकऱ्यांनी केळी काढणी न करता बागाच काढून टाकल्या. पण दर वाढल्याचे दिसताच बागा काढलेल्या शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. केळी उत्पादक गेल्या दोन वर्षांपासून दरासाठी झुंजत आहे. पण नेमकी बाग काढायला आणि दरवाढ यायला एकच गाठ पडली. त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे थोडीफार केळी आहेत त्यांनाच याचा लाभ होण्याची शक्यता आहे.

केळीची चणचण

  • दीड वर्षात पहिल्यांदाच गाठला पंधरा हजार रुपयांचा टप्पा
  • पश्‍चिम महाराष्ट्रातील रायपनिंग चेंबर्समध्ये केळीची चणचण
  • ज्या शेतकऱ्याकडे थोडीफार केळी आहेत त्यांनाच याचा लाभ होण्याची शक्यता
  • महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर केळी साठवणुकीसाठी व्यापारी मागणी करत आहेत. पण मागणीच्या तुलनेत केळी उपलब्ध नसल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. काही महिने दर वाढतच राहतील, अशी शक्यता आहे. - चेतन पाटील, केळी रायपनिंग चेंबर व्यावसायिक

    आमच्याकडे सध्या स्थानिक भागातून केळीच उपलब्ध नाहीत. केळीची मागणी वाढत असल्याने आम्ही आता बाहेरून केळी मागवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. दरात एकदम वाढ झाली आहे. - अविनाश पाटील, केळी रायपनिंग चेंबर व्यावसायिक

    दोन वर्षांचा अनुभव पाहता केळी लागवडीला पसंती दिली नाही. त्यामुळे भविष्यात मोठी टंचाई निर्माण होईल, अशी शक्यता आहे.   - विश्‍वास चव्हाण, केळी रोपवाटिकाचालक

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com