डॉ. मायींना विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ अध्यक्षपदापासून रोखले

डाॅ. मायी
डाॅ. मायी
Published on
Updated on

पुणे ः महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठे भरती मंडळाच्या अध्यक्षपदापासून डॉ. सी. डी. मायी यांच्यासारख्या कृषी शास्त्रज्ञाला पद्धतशीरपणे रोखण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘‘मलादेखील हे पद नकोय. पण मला माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा माणूस असल्याचे सांगून काही जणांनी ही खेळी केली असू शकते,’’ असे मत डॉ. मायी यांनी व्यक्त केले.  डॉ. मायी हे माजी कुलगुरू आहेतच, पण देशाच्या कृषी क्षेत्रातील सर्वात मोठी पदे भूषविलेले सध्याचे एकमेव मराठी शास्त्रज्ञ आहेत. देशाच्या शास्त्रज्ञ भरती मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी चार वर्ष भूषविले असून, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक आणि देशाचे कृषी आयुक्त म्हणून देखील कामकाज पाहिले आहे. शिस्तप्रिय काम आणि पारदर्शकपणा असलेल्या डॉ. मायी यांच्याकडे राज्यातील कृषी विद्यापीठे भरती मंडळाचे अध्यक्षपद देण्याचा प्रयत्न तत्कालीन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडून झाला होता. तथापि, एका लॉबीने त्यात कोलदांडा घातला आणि त्यांची नियुक्ती रखडल्याचे सांगितले जाते.  ‘‘मी स्वतः चार सर्वोच्च पदावर काम केले आहे. मी स्वतः देशपातळीवर कृषी शास्त्रज्ञ भरतीसाठी असलेल्या सर्वोच्च संस्थेत पाच हजार शास्त्रज्ञांची भरती केली. राज्यातील या पदाबाबत मला विचारणा झाली होती. मात्र, मी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगून बाजूला सारले जाण्याची शक्यता आहे. अर्थात आता मी देखील या पदासाठी इच्छुक नाही,’’ असे डॉ. मायी यांनी स्पष्ट केले.  डॉ. मायी यांचे वय सध्या ७२ वर्षे आहे. हीच माहिती मिळवून मंडळाच्या अध्यक्षपदासाठी वयाची अट कमी टाकली गेली आहे. मंडळ अध्यक्षपदासाठी ७० वर्षे वयोमर्यादा नमूद करण्यात आल्याने एक प्रकारे डॉ. मायी यांना पदापासून लांब ठेण्याचा प्रयत्न झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  दरम्यान, कृषी विद्यापीठे भरती मंडळाच्या नव्या अध्यक्षाचा शोध घेण्याचे काम अखेर राज्य शासनाने सुरू केल्याने विद्यापीठांच्या आशा उंचावल्या आहेत. माजी कुलगुरू दर्जाच्या व्यक्तीकडे मंडळाचे अध्यक्षपद दिले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘‘डॉ. खर्चे यांच्यानंतर एका शास्त्रज्ञाला मंडळाचे अध्यक्षपद देण्याचा प्रयत्न झाला होता. तथापि, या शास्त्रज्ञाचे निधन झाल्यामुळे मंडळ दिशाहिनच राहिले. आता परिषदेचे नवे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांनी मंडळाच्या नव्या अध्यक्षांसाठी पाठपुरावा सुरू केल्याने लवकरच नवा अध्यक्ष मिळणे अपेक्षित आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  विशिष्ट व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवूनच शोध मंडळाच्या अध्यक्षपदासाठी राज्यात किंवा राज्याच्या बाहेर सेवाकाल पूर्ण केलेला कोणताही कुलगुरू किंवा भारतीय कृषी संशोधन परिषदेचा माजी महासंचालक अशी पात्रता ठेवण्यात आली आहे. १७ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. ‘‘मंडळ अध्यक्षाचे निकष देताना विशिष्ट व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून शोध सुरू असल्याचा संशय मला आहे. मी या पदासाठी अजिबात इच्छुक नाही. मात्र, चुकीच्या व्यक्तीची निवड झाल्यास सत्याचा आग्रह धरणारे इतर शास्त्रज्ञ गप्प बसतील असे वाटत नाही,’’ असेही डॉ. मायी यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com