औषधी गुणधर्मांमुळे मसाला निर्यातीत वाढ : डॉ. चेरीयन

वर्धा ः ‘‘भारतीय मसाले पिकात अनेक औषधी गुणधर्म आहेत. कोरोनानंतरच्या काळात वाढलेल्या निर्यातीने याला दुजोरा मिळत आहे. तरी या संदर्भाने ठोस विश्‍लेषण होऊन निष्कर्ष अहवालाच्या माध्यमातून मांडल्यास त्याला अधिकृत दर्जा मिळेल. त्यासाठी आवश्‍यकता भासल्यास वैद्यकीय संशोधन क्षेत्राची मदत घेतली पाहिजे’’, असे मत कालिकत (केरळ) येथील सुपारी व मसाला संचालनालयाचे संचालक डॉ. होमी चेरीयन यांनी मंगळवारी (ता.१५) व्यक्‍त केले.
Spice exports increase due to medicinal properties: Dr. Cherian

गिरडस्थित मगन संग्रहालयात आयोजित पीडीकेव्ही वायगाव हळद उत्पादक आणि निर्यातदार संमेलनात ते बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच सुपारी व मसाला संचालनालयातर्फे हे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. विलास भाले, उद्यानविद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. पी. के. नागरे, कृषी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, मिरची व भाजीपाला संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. श्‍याम घावडे, संयोजन समितीचे डॉ. विजय काळे आदी उपस्थित होते. 

डॉ. चेरीयन म्हणाले, ‘‘कोरोनापूर्वी हळद व तत्सम औषधी गुणधर्म असलेल्या मसाला पिकांची निर्यात ७५ हजार टन इतकीच होती. मात्र गेल्या दोन वर्षात १ लाख ८० हजार टनावर ही निर्यात पोचली आहे. प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी भारतीय हळदीचा वापर आणि निर्यातही वाढली. कुरकुमीनचे प्रमाण अधिक असलेल्या वाणांचा औषधी उत्पादनांमध्ये वापर वाढला आहे. वायगाव हळदीचे क्‍लस्टर तयार करा’’, असा सल्लाही त्यांनी दिला.

  ‘‘टर्मरिक हब’साठी खासदार आग्रही’

‘‘हिंगोली जिल्ह्यात हळदीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तेथील खासदार ‘टर्मरिक हब विकसित व्हावे, या साठी आग्रही आहेत’’, अशी माहिती डॉ. चेरीयन यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com