Soybeans need to be sown by BBF method: Raut
Soybeans need to be sown by BBF method: Raut

सोयाबीनची ‘बीबीएफ’ पद्धतीने पेरणी गरजेची ः राऊत

ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करणे ही कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आता काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांनी केले.

सातारा ः ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करणे ही कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आता काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांनी केले.  

नागठाणे येथील कल्पना खंडाईत यांचे शेतात बीबीएफ पेरणी प्रात्यक्षिक प्रारंभ प्रसंगी श्री. राऊत बोलत होते. या वेळी कृषिभूषण मनोहर साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य किरण साळुंखे, कृषी अधिकारी अनिल महमूलकर, युवराज काटे, रोहिदास तीटकारे, गणेश साळुंखे आदी उपस्थित होते.

श्री. राऊत पुढे म्हणाले, रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करून सोयाबीनची पेरणी केल्यास रुंद वरंबा किंवा गादी वाफ्यावर ३ ओळींत पेरणी होऊन दोन ओळींतील अंतर ४५ सेमी आणि दोन रोपांतील अंतर १५ सेंमी राखले जाते. त्यामुळे सोयाबीनचे एकरी फक्त १५ ते १६ किलो बियाणे लागते. त्यामुळे बीबीएफ पेरणी पद्धत ही आता विक्रमी उत्पादनासाठी गरजेची झाली आहे. अशाप्रकारची बीबीएफ पद्धतीने पेरणी प्रात्यक्षिके ४०० एकर क्षेत्रावर नागठाणे व परिसरातील गावात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्याची माहिती कृषी सहायक अंकुश सोनावले यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com