देशात कापसाचा सरासरी इतकाच पेरा

दरातील तेजीच्या परिणामी यावर्षी कापूस लागवड क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्यावेळी शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा कमी करीत सोयाबीनला पसंती दिली होती.
Sow the average amount of cotton in the country
Sow the average amount of cotton in the country

नागपूर ः दरातील तेजीच्या परिणामी यावर्षी कापूस लागवड क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्यावेळी शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा कमी करीत सोयाबीनला पसंती दिली होती. त्यामुळे देशातील १३० लाख हेक्‍टर क्षेत्र १० लाख हेक्‍टरने कमी होत १२० लाख हेक्‍टरचा पेरा झाला होता. यावेळी कापसाचा पेरा नेहमीप्रमाणे सरासरी गाठेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

महाराष्ट्र, पंजाब, हरियाना, राजस्थान, आंधप्रदेश, गुजरात, तेलंगणासह तब्बल ११ राज्यांमध्ये कापूस लागवड होते. या ११ राज्यातील सरासरी लागवड ही १३० लाख हेक्‍टर इतकी आहे. मात्र गेल्या २०२१-२२ या वर्षात सरासरीपेक्षा लागवडक्षेत्रात १० लाख हेक्‍टरची घट नोंदविण्यात आली. महाराष्ट्राचे सरासरी लागवड क्षेत्र ४० लाख हेक्‍टर असताना ते ३५ लाख हेक्‍टरपर्यंत खाली आले होते. याउलट सोयाबीनचा पेरा ४२ लाख हेक्‍टरवर पोचला होता. 

देशाच्या इतर भागातही गेल्या हंगामातील दरातील तेजीच्या परिणामी शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली होती. त्याचा फटका कापसाला बसला. यंदाच्या हंगामात मात्र कापसाने ११ हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा पल्ला गाठला. दरातील तेजीच्या परिणामी यंदा शेतकरी कापसाकडे वळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. असे असले तरी गेल्या हंगामात कमी झालेले १० लाख हेक्‍टर क्षेत्रावरच ही लागवड होणार असल्याचा दावा तज्ज्ञांकडून होत आहे. हरियाना, पंजाब या राज्यांमध्ये एप्रिल ते १५ मे या कालावधीत कापसाची लागवड होते. त्या पार्श्‍वभूमीवर या भागात अनेक कंपन्यांनी आपले बियाणे बाजारात आणले आहे.

गेल्यावेळी सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी या पिकाखालील क्षेत्रात वाढ केली. यावेळी मात्र कापसाचे दर चांगलेच तेजीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सरासरी इतकी कापसाची लागवड अपेक्षित आहे. सोयाबीनमधील तेजीमुळे २०२१-२२ मध्ये कापूस लागवड सरासरीच्या १३० लाख हेक्‍टरवरुन १२० लाख हेक्‍टरवर आली होती. यावर्षी कापसाचा सरासरी इतका पेरा होणार आहे.  - डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com