लातूर : येथील विभागीय कृषी कृषी कार्यालया अंतर्गत पाच जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १८ टक्के कमी झाला आहे. तर गव्हाची पेरणी सरासरीच्या पुढे जाऊन व हरभऱ्याची पेरणी सरासरी क्षेत्राच्या दुपटीपेक्षाही जास्त झाली आहे. विभागात रब्बीची पेरणी सरासरीच्या १४४ टक्के इतकी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.
रब्बी हंगामासाठी लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात सरासरी क्षेत्र १० लाख ८६ हजार ६१० हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात १५ लाख ६१ हजार ५४९ हेक्टरवर अर्थात सरासरी क्षेत्राच्या १४४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. लातूर जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख २८ हजार ४३ हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात ३ लाख ३९ हजार ३७६ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या १४९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७५ हजार ४१ हेक्टर, तर पेरणी ४ लाख २२ हजार ७५२ हेक्टरवर अर्थात सरासरीच्या ११३ टक्के क्षेत्रावर झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी १ लाख ४० हजार २२३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३ लाख ५७ हजार ४६१ हेक्टरवर अर्थात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत २५५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात सरासरी क्षेत्र २ लाख १५ हजार ९६१ हेक्टर, तर पेरणी ११८ टक्के म्हणजे २ लाख ५५ हजार २३९ हेक्टरवर झाली.
हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख २७ हजार ३४० हेक्टर, तर पेरणी १४७ टक्के म्हणजे १ लाख ८६ हजार ७०४ हेक्टरवर झाली आहे.
लातूर कृषी विभागात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ६५ हजार ७३३ हेक्टर आहे. पेरणी सरासरीच्या ८२ टक्के म्हणजे २ लाख ९९ हजार ४०८ हेक्टरवरच झाली आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र १ लाख २७ हजार ५७८ हेक्टर, तर पेरणी १ लाख ५९ हजार ३१० हेक्टरवर झाली. हरभऱ्याची पेरणी १० लाख ५८ हजार ७४० हेक्टरवर झाली आहे.
करडईचे क्षेत्र ३९ टक्केच
मक्याचे सरासरी क्षेत्र २२ हजार ३५ हेक्टर, तर पेरणी १६९०४ हेक्टरवर झाली. त्याची सरासरी ७७ टक्केच आहे. करडईचे सरासरी क्षेत्र ३६१६७ हेक्टर, तर पेरणी केवळ १४ हजार ६६ म्हणजे सरासरीच्या केवळ ३९ टक्के आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.