गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’ने बनविला इझी काफ पुलर

calf puller
calf puller
Published on
Updated on

माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो. यासाठी संशोधन करून, नवीन यंत्रांच्या निर्मितीचे काम प्रयोगशील विद्यार्थी करताहेत. या पैकीच एक आहे, बारामती येथील पशुसंवर्धन महाविद्यालयातील शुभम जाधव. या विद्यार्थ्याने अडलेल्या गाई, म्हशींची प्रसूती सुलभ होण्यासाठी ‘इझी काफ पुलर’ हे वैशिष्ट्यपूर्ण यंत्र विकसित केले आहे.   आजकाल बहुतांश पशुपालकांकडे संकरित गाई आणि म्हशी आहेत. यांच्या प्रसूतीदरम्यान वासरे अडकण्याचा प्रकार पाहायला मिळतो. या वेळी पशुतज्ज्ञ तात्काळ उपलब्ध झाला नाही तर गाय, म्हैस किंवा त्यांची वासरे मृत होण्याची शक्यता असते. सशक्त गाई, म्हशी आपोआप वितात. परंतु, अशक्त गाय किंवा संकरित गाई विताना वासरू अडकणे (डिस्टोकिया) या जननप्रक्रियेतील अडचणीला पशुपालकाला नेहमी सामोरे जावे लागते. साधारणपणे अशा परिस्थितीत गाईची प्रसूती करण्यासाठी जास्त माणसांची गरज भासते.  गर्भाशयाच्या तोंडातून वासरू आपोआप बाहेर येत नसेल, तर चार लोकांच्या मदतीने ओढून काढावे लागते. अशा वेळी जास्त जोर लावून वासरू ओढून काढल्यास गर्भाशय फाटण्याची शक्यता असते. या प्रकारात वासरू आणि गाय, म्हशींच्या जिवाला धोका होऊ शकतो. जर गर्भाशयाला इजा झाली तर गाय, म्हैस पुन्हा गाभण राहू शकत नाही. काही वेळा गाई, म्हशी लवकर माजावर येत नाहीत.

असे आहे इझी काफ पुलर 

  • यंत्र वापरून पशुपालक आणि पशुवैद्यकाला एक ते दोन व्यक्तींची मदत घेऊन अडलेल्या गाय, म्हशींची प्रसूती करता येणे शक्य.
  • यंत्र वापरण्यास सोपे. गर्भाशयाच्या तोंडातून यंत्राने वासरू बाहेर ओढताना एकसारखे ओढले जाते. गर्भाशयाला कोणतीही इजा होत नाही. एक व्यक्तीदेखील पशुतज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसार अडलेली गाय, म्हशीची प्रसूती करू शकतो.
  • यंत्र वापरताना वासराच्या पायाला दोरी बांधून यंत्रावर बसवलेल्या पुलाद्वारे एकसारखा दाब देऊन खटका मागे ओढला असता वासरू गर्भाशयाच्या तोंडातून व्यवस्थित बाहेर येते. 
  • यंत्राच्या झाल्या चाचण्या 

  • बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या गोठ्यामध्ये इझी काफ पुलर यंत्राचा वापर करून दहा गायींची प्रसूती करण्यात आली. या यंत्राच्या सर्व तपासण्या नियमानुसार झाल्या आहेत. हे यंत्र वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. यंत्राद्वारे अवघ्या दोन मिनिटांत गर्भाशयाच्या तोंडातून वासरू ओढून बाहेर काढले जाते. गाई, म्हशींना इजा होत नाही. 
  • शुभम जाधव याने या यंत्राचे पेटंट दाखल केले आहे. सध्या शुभम हे यंत्र किफायतशीर किमतीला विकत असून, भविष्यात मोठ्या प्रमाणात यंत्राच्या उत्पादनाचे नियोजन आहे.  
  • इझी काफ पुलर यंत्र विकसित करण्यासाठी शुभम जाधव याला पशुसंवर्धन महाविद्यालयातील डॉ. धनंजय भोईटे, कृषी विज्ञान केंद्रातील पशुतज्ज्ञांची मदत झाली. अटल इन्क्युबेशन सेंटरमधील तज्ज्ञ शुभमला यंत्राचे पेटंट मिळविणे, तसेच यंत्र निर्मितीसाठी बीज भांडवल उभारण्यासाठी मदत करीत आहेत. 
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com