शॉट होल बोररचा डाळिंबावर प्रादुर्भाव

राज्यात सातत्याने बदलते वातावरण आणि अति पावसाचा फटका डाळिंब पिकाला बसू लागला आहे. मूळकुजवा आणि ‘शॉट होल बोरर’ (पिन होल बोरर) यांचा प्रादुर्भाव बागेवर येऊ लागला आहे.
Shot hole borer infestation on pomegranate
Shot hole borer infestation on pomegranate
Published on
Updated on

सांगली ः राज्यात सातत्याने बदलते वातावरण आणि अति पावसाचा फटका डाळिंब पिकाला बसू लागला आहे. मूळकुजवा आणि ‘शॉट होल बोरर’ (पिन होल बोरर) यांचा प्रादुर्भाव बागेवर येऊ लागला आहे. त्यामुळे डाळिंबाची झाडे वाळू लागली आहेत. या रोगांमुळे राज्यातील सुमारे १५ टक्के बागा बाधित झाल्या आहेत. परिणामी, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर नवे संकट ओढावले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

राज्यात सुमारे १ लाख ५० हेक्टर डाळिंबाची लागवड आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील वातावरणात बदल होत आहे. त्याचा फटका डाळिंब पिकाला बसू लागला आहे. त्यातच अति पावसामुळे डाळिंब पीक धोक्यात आले आहे. तेलकट डाग रोगामुळे अगोदरच डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, उत्पादनही घटले आहे. बागा वाचविण्यासाठी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यातून शेतकरी मार्ग काढत आहेत.

गेल्या वर्षापासून शॉट होल बोरर या किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यासह नगर, जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव वेगाने वाढ असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसत होता. ही कीड अत्यंत लहान छिद्र पाडते. त्यामुळे ते लक्षात येत नाही. झाडाच्या खोडाच्या खाद्य पुरवठा करणाऱ्या वाहिन्या तुटलेल्या असतात.  फुलांचे ‘सेटिंग’ होईपर्यंत झाड चांगले दिसते. पण फळ लागल्यावर वाढू लागताच झाड पिवळे पडून वाया गेलेले असते, असे शेतकरी सांगतात. परंतु प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर त्वरित तो दिसत नाही. हळूहळू वाढताना दिसतो आहे.

आतापर्यंत किती हेक्टरवरील डाळिंब पीक वाया गेले याची अधिकृत माहिती कृषी विभागाकडे नाही. राज्यात सध्या १५ टक्के मूळ कुजवा, शॉट होल बोररमुळे बागांचे नुकसान झाले आहे. त्यावर डाळिंब संशोधन केंद्राने संशोधन करून उपाय शोधावेत, अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.

झाड कमजोर झाल्यामुळे प्रादुर्भाव राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जोत्स्ना शर्मा म्हणाल्या, की मर रोग, तसेच अति अवर्षणाचा ताण, अति पाऊस, अन्नद्रव्यांची कमतरता आदी कारणांमुळे झाड कमजोर होते. अशा झाडांवर शॉट होल बोररचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

गेल्या वर्षी प्रादुर्भाव कमी करण्यासाठी धडपड केली. पण संपूर्ण बाग यामुळे नुकसानग्रस्त झाली. प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याप्रमाणे शॉट होल बोररवर संशोधन करण्यासाठी डाळिंब संशोधन केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे. - संदीप भागवत, एरंडगाव, ता. शेवगाव, जि. नगर

डाळिंबाला बदलत्या वातावरणाचा फटका बसू लागला आहे. माझी १२२० झाडे आहेत. त्यापैकी १८० झाडाला शॉट होल बोररचा प्रादुर्भाव झाल्याने ही झाडे जळाली आहेत. झाडे वाचविण्यासाठी प्रयत्न केला पण यश आले नाही. डाळिंबावर नवे संकट आले आहे, त्यामुळे झाडे कशी जगवायची असा प्रश्‍न आहे. - महादेव इंगोले,  डाळिंब उत्पादक शेतकरी, खिलारवाडी, ता. सांगोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com