
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञतापर्व’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटना व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्व आयोजनाबाबत बैठक व पत्रकार परिषद झाली. या वेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी ही माहिती दिली. बैठकीस व पत्रकार परिषदेस ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संभाजीराजे छत्रपती, जयंत आजगावकर, आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व रमेश जाधव उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, की राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दीपर्व वर्षभर साजरे करण्यात येणार असून, या पर्वात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उपक्रमात नवीन कार्यक्रम राबविण्यात मान्यवर व जनतेकडून आलेल्या नवीन सूचनांचा स्वीकार केला जाईल. ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, की राजर्षी शाहू महाराज हे समतेचा संदेश देणारा जगातील एकमेव राजा, पुरोगामी विचारांचा जागर करणारे राजा असून, राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दीपर्वात शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपतींना देऊन हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येईल.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्वात राज्यातील नामवंत शेतकऱ्यांसाठी ॲग्रिकल्चर कार्यशाळा घेण्यात यावी. दिल्लीतही कार्यक्रम व्हावा, शाहू महारांजानी भेट दिलेल्या ठिकाणी कार्यक्रम व्हावेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.