ग्राम रोजगार सेवकाचे मानधन आता थेट ग्रामपंचायतीमार्फत

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नियुक्त ग्रामरोजगार सेवकांना यापुढे थेट ग्रामपंचायतीमार्फत मानधन वितरण करण्यात येणार आहे. मानधन वितरणाच्या या नव्या प्रणालीमुळे राज्यातील सुमारे २५ हजार २५८ ग्रामरोजगार सेवकांना वेळेवर मानधन मिळणार आहे.
Remuneration of Gram Rozgar Sevak is now directly through Gram Panchayat
Remuneration of Gram Rozgar Sevak is now directly through Gram Panchayat

नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नियुक्त  ग्रामरोजगार सेवकांना यापुढे थेट ग्रामपंचायतीमार्फत मानधन वितरण करण्यात येणार आहे.  मानधन वितरणाच्या या नव्या प्रणालीमुळे राज्यातील सुमारे २५ हजार २५८ ग्रामरोजगार सेवकांना वेळेवर मानधन मिळणार आहे.

ग्रामपंचायतीमार्फत थेट मानधन वितरणाचा कामठी तालुक्यातील पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे संपूर्ण राज्यात नवीन प्रणालीनुसार मानधन वितरणाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त ए. एस. आर. नायक यांनी दिली.

रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम रोजगार सेवकांना दिल्या जाणाऱ्या मानधनाचा विलंब टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात आला. तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामरोजगार सेवक नियुक्त करण्यात आले आहे. या सेवकांना १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत २६ हजार ८६९ मनुष्य दिवस निर्मिती झाली. त्यानुसार ३ लक्ष ६७ हजार ९७४ रुपयांचे अनुदान थेट संबंधित ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्यात आले असून ग्रामपंचायतीमार्फत ग्रामरोजगार सेवकांना सुलभपणे मानधन वितरित करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण राज्यात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय आयुक्त ए. एस. आर. नायक यांनी घेतला.

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी ग्रामरोजगार सेवकांची महत्त्वाची भूमिका असून ‘रोहयो’वरील मजुरांना त्यांनी केलेल्या कामाच्या नोंदी तसेच मिळणारी मजुरी यांचे हजेरी बुक तयार करून मजुरांच्या खात्यात थेट मजुरी जमा करण्याची जबाबदारी आहे.

विलंबामुळे थेट मानधन देणार राज्यात २५ हजार २५८ ग्रामरोजगार सेवकांना या नव्या मानधन वितरण प्रणालीमुळे  वेळेवर मानधन मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मानधनापोटी ४८ कोटी ९३ लक्ष रुपयापेक्षा जास्त निधी वितरित केल्या जातो. ग्रामरोजगार सेवकांना मानधनापोटी १ लक्ष ९० हजार ४०३ रुपये म्हणजेच सरासरी मासिक १५ हजार ८६७ रुपये मानधनाचे वितरण केल्या जाते हे मानधन एकूण वार्षिक मनुष्य दिवस व एकूण मजुरी प्रदानाच्या खर्चाच्या टक्केवारीवर देण्यात येते. पूर्वी मानधन खंडविकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत होते. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना वितरित झाल्यानंतर मानधन मिळत होते. या प्रक्रियेला होणारा विलंब कमी करून आयुक्तालयाने थेट मानधनाचा निर्णय घेतला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com