शिल्लक उसाची शेजारील कारखान्यांकडून तोड सुरू

राज्यात वेळेत हंगाम पूर्ण व्हावा यासाठी साखर आयुक्तालयाच्या वतीने ज्या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात जादा ऊस शिल्लक आहे त्या कारखान्याचा ऊस शेजारील कारखान्याकडून तोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
The remaining sugarcane is being harvested from neighboring factories
The remaining sugarcane is being harvested from neighboring factories

कोल्हापूर : प्रत्येक वर्षी ऊस गाळपासाठी स्पर्धा करणाऱ्या कारखान्यांना आता इतर कारखान्याच्या शिल्लक उसाची तोड करावी लागत आहे. राज्यात वेळेत हंगाम पूर्ण व्हावा यासाठी साखर आयुक्तालयाच्या वतीने ज्या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात जादा ऊस शिल्लक आहे त्या कारखान्याचा ऊस शेजारील कारखान्याकडून तोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एरवी एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी करणाऱ्या कारखान्यांकडून यंदा मात्र अधिकृतपणे दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडावा लागत आहे.

राज्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना अद्यापही राज्यातील सातारा, परभणी, नांदेड, औरंगाबाद, बीड, नगर, लातूर जिल्ह्यांमध्ये शिल्लक उसाची डोकेदुखी कायम आहे. काही कारखाने बंद आहेत. तर काही कारखाने अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत उसाचे गाळप होऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. यातून मार्ग काढण्यासाठी संबंधित प्रादेशिक सहकारी संचालक साखर व साखर कारखान्यांच्या शेती अधिकारी यांच्यामार्फत दर आठवड्यास अतिरिक्त ऊस गाळपाचा आढावा घेऊन ऊस गाळपाचे नियोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये यासाठी शेजारील कारखान्यामार्फत ऊसतोडणीचे नियोजन करण्यात येत आहे. शिल्लक उसाची तोडणी करण्यासाठी विविध विभागांतील सुमारे ३५ कारखाने स्वतःच्या ऊसाव्यतिरिक्त इतर कारखान्यांना ऊसगाळप करणार आहेत.

गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा ९० हजार हेक्‍टर ऊस क्षेत्र जास्त आहे. यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा नांदेड विभागात ४३००० पुणे विभागात ३१००० हेक्‍टर क्षेत्र जादा आहे. सोलापूर, अमरावती, नागपूर वगळता नगर, नांदेड, औरंगाबाद विभागात १५००० ते २५००० हेक्टर पर्यंत जादा ऊस उपलब्ध आहे. सध्या कोल्हापूर विभागाचा हंगाम संपुष्टात येत आहे. या विभागात शिल्लक उसाची समस्या राहणार नाही अशी शक्यता आहे. इतर विभागांत मात्र शिल्लक उसाची समस्या कारखानदारांना ही सतावत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून साखर कारखान्याचा ऊस शिल्लक राहणार आहे. या उसाची तोड अन्य कारखान्यांना करण्यास सांगण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com