स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादन खर्च कमी करा : पवार

माळेगाव ः ‘‘माळेगावसह सर्वच साखर कारखान्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावा’’, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
 Reduce production costs to stay competitive: Pawar
Reduce production costs to stay competitive: Pawar
Published on
Updated on

माळेगाव ः ‘‘देशात वीज आणि इंधनाची पुरेशी गरज विचारात घेता वीज आणि  इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सर्वत्र होत आहेत. अगदी जेथे ऊस पिकत नाही, अशा ठिकाणीही विशेषतः आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यात तांदूळ, मक्यापासून इथेनॉलनिर्मिती होत आहे. तशीच विजेची स्थिती आहे. त्यामुळे आगामी काळातील या धंद्यातील स्पर्धा विचारात घेता माळेगावसह सर्वच साखर कारखान्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावा’’, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. 

माळेगावने १२ लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करत १५ लाख टनांचे उद्दिष्ट ठेवल्याबद्दल पवार यांनी कारखाना प्रशासनाचे कौतुक केले.  

राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचे आवाहन, साखर विक्री, इथेनॉल व वीजनिर्मिती, साखर साठ्याचे नियोजन आणि एकरी ऊस उत्पादन घटत चालल्याची कारणे विचारात घेऊन पवार यांनी माळेगाव कारखान्याला भेट दिली. राष्ट्रवादीचे संभाजी होळकर, बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्शीलाल आटोळे, कार्यकारी संचालक (एमडी) राजेंद्र जगताप उपस्थित होते.

देशात ऊस उत्पादन न होणाऱ्या भागात इथेनॉल पुरवठा करण्याचे काम कारखान्यांऐवजी ऑइल कंपन्यांनी केल्यास सर्व ठिकाणी इथेनॉल पुरवठा होऊ शकतो. ही बाब पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. 

पवार म्हणाले, ‘‘माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात प्रशस्त रस्ते, साखरेसाठी वेअर हाउस आणि एकरी उत्पादन वाढण्यासाठी जमिनी सुपीक करण्यासाठी मोठी गुंतवणूक केल्याशिवाय पर्याय नाही. माळेगावने ऊस गळितात १२ लाखाचा टप्पा ओलांडला आणि १५ लाखांपर्यंत गळीत करण्याचा मानस ठेवला ही गोष्ट कौतुकास्पद आहे.’’ 

नीरा नदीकाठच्या क्षारपड जमिनींचा विचार केला की नाही, यावर मात्र ‘साहेब आपणच आम्हाला मदत करावी’, अशी विनंती संचालक मंडळाने केली. 

पवार यांनी लागलीच व्हीएसआय संस्थेतील वरिष्ठांशी संपर्क साधला. संबंधितांना माळेगावच्या कार्यक्षेत्रातील माती व पाण्याचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com