वीजप्रश्‍नी विधानसभेत आवाज उठवा

वीजप्रश्‍नी विधानसभेत आवाज उठवा, अन्यथा सार्वजनिक कार्यक्रमात अडथळे आणू असा इशारास्वाभिमानी शेतकरी संघटनेनेदिला आहे.
Raise your voice in the assembly on power issues
Raise your voice in the assembly on power issues

नाशिक : वीजबिलासंदर्भात नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रह्मदेव आला तरी वीजबिल भरावे लागेल, असे वक्तव्य केले होते. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहे. या अनुषंगाने निफाड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार दिलीप बनकर यांना निवेदन देण्यात आले आहे. वीजप्रश्‍नी विधानसभेत आवाज उठवा, अन्यथा सार्वजनिक कार्यक्रमात अडथळे आणू असा इशारा दिला आहे. 

शेतकऱ्यांची तोडलेल्या वीजजोडण्या तातडीने पूर्ववत कराव्या व दिवसा दहा तास वीजपुरवठा व्हावा या मागणीसाठी राजू शेट्टी २२ फेब्रुवारीपासून उपोषणाला बसलेले आहेत. प्रत्येक मतदारसंघातील बहुसंख्य मतदार शेतकरी आहोत. त्यांनी मते दिल्यामुळेच तुम्ही आमदार म्हणून निवडून आला आहात. दुर्देवाने महावितरण आणि राज्य सरकारने आंदोलनाला फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वच राजकीय पक्षांबद्दल प्रचंड नाराजी व चीड निर्माण झाली आहे. आपणही आपली भूमिका स्पष्ट करून या मागणीच्या बाजूने ठामपणाने उभे राहावे, असे निवेदनात म्हटले आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राम राजोळे यांनी आमदार दिलीप बनकर यांना निवेदन दिले. सभागृहात हा विषय मांडण्याची विनंती केली. याप्रसंगी युवक तालुकाध्यक्ष निफाड सचिन  खालकर उपस्थित होते. 

शासनाला काही देणे-घेणे नाही  गेल्या दोन-तीन वर्षांपासून करोना, नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. याबद्दल शासनाला काही देणे घेणे नाही. वीजपुरवठ्यासंबंधी विधानसभेच्या अधिवेशनात जोरदार आवाज उठवावा. तसे न झाल्यास, तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग न घेतल्यास तुमच्या सार्वजनिक कार्यक्रमात अडथळे आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’कडून देण्यात आला आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com