रब्बी पीकविमा योजनेत  १२.५ लाख शेतकऱ्यांचा सहभाग 

पंतप्रधान पीकविमा योजनेत राज्यातील साडेबारा लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. गेल्या हंगामापेक्षा यंदा ४४ हजार शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असून, शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी एकूण ६७७ कोटी रुपये विमा कंपन्यांकडे भरले आहेत.
Rabbi Peakwima Yonet 12.5 Lakh Shetkalyancha Participation
Rabbi Peakwima Yonet 12.5 Lakh Shetkalyancha Participation
Published on
Updated on

पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत राज्यातील साडेबारा लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. गेल्या हंगामापेक्षा यंदा ४४ हजार शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असून, शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी एकूण ६७७ कोटी रुपये विमा कंपन्यांकडे भरले आहेत.  वातावरण बदलाच्या पार्श्‍वभूमीवर पावसातील अनियमितता, पावसातील खंड, गारपीट, कमी अधिक तापमान यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आहे. या स्थितीत पीकविमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य राखण्यास काही प्रमाणामध्ये मदत होत आहे. त्यामुळे देखील विमा योजनेकडे शेतकरी जागरूकपणे पाहत आहेत, असे कृषी विभागाचे निरीक्षण आहे.  रब्बी हंगाममध्ये पीकविमा योजनेत सहभाग नोंदवताना सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पडलेला पाऊस आणि पाण्याची उपलब्धता या वरून शेतकरी रब्बी पीक उत्पादनाचे आराखडे बांधत असतात. हवामान धोक्यामुळे पीक नुकसानीची वारंवारता वाढत असल्याने अभ्यासू शेतकऱ्यांनी योजनेतील सहभागही वाढविला असल्याचे दिसून येते. रब्बीच्या २०२१-२२ मधील हंगामात राज्यातील १२.४५ लाख शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला आहे. गेल्या हंगामात मात्र हाच सहभाग १२.०१ लाख शेतकऱ्यांपुरता मर्यादित होता. यंदा मात्र ४४ हजार शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. 

मराठवाड्यात वाढला शेतकऱ्यांचा सहभाग  वातावरण बदलाच्या धोक्यांना शेतकरी सातत्याने सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मराठवाडा विभागात विमा योजननेतील शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. यावरून शेतकरी आपल्या पीक नियोजनामध्ये विम्याबाबत अभ्यासपूर्ण निर्णय घेत असल्याचे स्पष्ट होते आहे. विमा योजनेतील सहभागाची विभागनिहाय तुलना केली असता कोकण, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, पुणे विभागात गत वर्षीच्या तुलनेत सहभागात घट झाली आहे. मात्र औरंगाबाद, लातूर, नागपूर विभागांत सहभाग वाढला आहे. यात हिंगोली जिल्ह्यातील सहभागात सर्वाधिक १७२ टक्के इतकी वाढ झाली आहे. परभणी १०२ टक्के, उस्मानाबाद ६६ टक्के, तर बीडमध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. फक्त अहमदनगर जिल्ह्यात सहभागात २९ टक्के इतकी घट दिसते आहे. 

बाजारमूल्य असलेल्या पिकांची लागवड  इतर कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रातील शेतकरी विमा योजनेचा अधिक अभ्यास करीत असून, काळजीपूर्वक निर्णय घेतो आहे. सुशिक्षित तरुणांचा शेतीमधील वाढता सहभाग यातून अधोरेखित होतो आहे. दुसऱ्या बाजूला विकेल ते पिकेल ही संकल्पना जोरदारपणे मांडली जात आहे. त्यामुळे बाजारमूल्य असलेल्या पिकांची पेरणी वाढविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

अशी आहेत रब्बी विमा हंगामाची वैशिष्ट्ये  -सहभागी झालेले कर्जदार शेतकरी ः १,०७,५४५  -सहभागी झालेले बिगर कर्जदार शेतकरी ः ११,३७,०२२  -विमाहप्ता भरणारे एकूण शेतकरी ः १२,४४,७६७  -विमा संरक्षित पीक क्षेत्र ः ८,४६,१८२  प्रतिक्रिया 

राज्य सरकारने ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेचा सातत्याने प्रचार प्रसार केला. त्यामुळे शेतकरीदेखील अधिक नफा देणाऱ्या पिकांकडे वळत आहेत. पीकविमा योजनेतील सहभागाचा अभ्यास केल्यास शेतकऱ्यांचा बदलता कल लक्षात येतो.  - विनयकुमार आवटे, मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com