Rabbi on 22.98 lakh hectares in Marathwada
Rabbi on 22.98 lakh hectares in Marathwada

मराठवाड्यात २२.९८ लाख हेक्‍टरवर रब्बी

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात २२ लाख ९८ हजार ९६२ हेक्‍टरवर रब्बीची पिके उभी आहेत. रब्बीचे सरासरी क्षेत्र १६ लाख ९१ हजार १४३ हेक्‍टर आहे. सरासरी क्षेत्राचा विचार करता जवळपास ६ लाख हेक्‍टरने जास्त पेरणी झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात २२ लाख ९८ हजार ९६२ हेक्‍टरवर रब्बीची पिके उभी आहेत.  रब्बीचे सरासरी क्षेत्र १६ लाख ९१ हजार १४३ हेक्‍टर आहे. सरासरी क्षेत्राचा विचार करता जवळपास ६ लाख हेक्‍टरने जास्त पेरणी झाली आहे.

कृषीच्या औरंगाबाद विभागातील जालना, बीड व औरंगाबाद या तीन जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ६ लाख ४ हजार ५३३ हेक्‍टर इतके आहे. त्या तुलनेत २० जानेवारीपर्यंत सरासरीच्या १३४ टक्‍के म्हणजे ८ लाख १२ हजार २६५ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. लातूर कृषी विभागातील उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १० लाख ८६ हजार ६१० हेक्‍टर आहे. त्या तुलनेत १३७ टक्‍के क्षेत्रावर अर्थात १४ लाख ८६ हजार ६९७ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याची सर्वाधिक १३ लाख ४५ हजार ६६७ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यांतील ३ लाख २३ हजार ९२१ हेक्‍टर व लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यातील १० लाख २१ हजार ७४६ हेक्‍टरवरील पेरणी झालेल्या हरभऱ्याच्या क्षेत्राचा समावेश आहे. 

रब्बी ज्वारीची ५ लाख ३३ हजार २७७ हेक्‍टरवर पेरणी झाली. त्यामध्ये लातूर कृषी विभागातील २ लाख ९० हजार २२७ हेक्‍टर व औरंगाबाद कृषी विभागातील २ लाख ४३ हजार ५० हेक्‍टरवरील रब्बी ज्वारी पिकाचा समावेश आहे. सरासरीपेक्षा अधिक ३ लाख १९ हजार हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाली. औरंगाबाद व जालना हे दोन जिल्हे मका पिकाचे हब मानले जातात. या दोन जिल्ह्यासह बीड जिल्हा मिळून औरंगाबाद कृषी विभागात रब्बी मक्याचे सरासरी क्षेत्र २९ हजार ५९६ हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात ५१ हजार ९१३ हेक्‍टरवर मक्याची पेरणी झाली. दुसरीकडे लातूर कृषी विभागात मक्याचे सरासरी क्षेत्र २२ हजार ३५ हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात १७ हजार ११७ हेक्‍टरवरच पेरणी झाली. 

तेलबिया असलेल्या करडईचे क्षेत्र वाढीसाठीच प्रयत्न कमी पडत असल्याचे क्षेत्रावरून स्पष्ट होत आहे. औरंगाबाद कृषी विभागात करडईचे सरासरी क्षेत्र ३७८८ हेक्‍टर, प्रत्यक्षात केवळ १४ टक्‍के म्हणजे ५६३ हेक्‍टरवरच करडईची पेरणी झाली. लातूर कृषी विभागात करडईचे सरासरी क्षेत्र ३६ हजार १६७ हेक्‍टर आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com