एचटीबीटी बियाणे विक्रीच्या घटना यंदा तीन राज्यांमध्ये आढळल्या : पुरुषोत्तम रुपाला

पुरुषोत्तम रुपाला
पुरुषोत्तम रुपाला

नवी दिल्ली: देशात तणनाशक सहनशील कापूस बियाणे (एचटीबीटी) लागवडीस मान्यता नाही. तरीही महाराष्ट्र, तेलंगण आणि गुजरात राज्यांमध्ये एचटीबीटी बियाणे विक्रीच्या घटना घडल्या आहेत. परंतु, प्रतिबंध असलेल्या कीटकनाशकांच्या विक्रीच्या घटना देशात घडल्या नाहीत, अशी माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी मंगळवारी (ता.२) लोकसभेत दिली. लोकसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री रूपाला यांनी ही माहिती दिली. ‘‘ देशात एचटीबीटी बियाणे विक्रीस बंदी  आहे. तरीही, तीन राज्यांमध्ये महाराष्ट्र, तेलंगण आणि गुजरात राज्यांमध्ये विक्रीच्या घटना घडल्या आहेत. गुजरात राज्यात एचटीबीटी विक्रीच्या आठ घटना घडल्या आहेत. वडोदरा, कच्छ, साबरकंठा आणि गिर-सोमनाथ येथे याप्रकरणी सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भावनगर येथे एक गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे,’’ अशी माहिती मंत्र्यांनी दिली. महाराष्ट्रात २० गुन्हे दाखल महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार नागपूर, चंद्रपूर,  परभणी, नंदुरबार, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये एचटीबीटी बियाणे जप्त करण्यात आले आहेत, असे मंत्री रूपाला यांनी सांगितले. तसेच ‘‘एकूण ९ हजार ३८७ बंदी असलेले कापूस बियाण्यांची पाकिटे आणि एक हजार ८७ किलो खुले बियाणे जप्त करण्यात आले आहे. या बियाण्यांची किंमत एक कोटी दोन लाख ८७ हजार रुपये आहे. हे बियाणे विक्री प्रकरणात संबंधितांवर त्या त्या पोलिस ठाण्यांत २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,’’ असेही त्यांनी सांगितले.  तेलंगणात सर्वांधिक गुन्हे मंत्री रूपाला म्हणाले की, तेलंगणात एचटीबीटी बियाणे विक्रीची सर्वाधीक गुन्हे दाखल आहेत. २०१९ मध्ये येथे कापूस बियाण्यांचे ३०२ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी आठ नमुन्यांमध्ये एचटीबीटीचे अंश आढळून आले. दोषींविरोधात दंडात्मक कारवाई करीत ४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; तर ४४ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच, प्रशासनाने ७ बियाणे परवान्यांवर कारवाई केली आहे. राज्यात तब्बल २९ हजार ६४७ क्विंटल एचटीबीटी जिन असलेले बियाणे जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत नऊ कोटी सात लाख रुपये आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com