परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा खरेदी 

परभणी, हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघातर्फे खरेदी करण्यात आलेल्या हरभऱ्यापैकी ८ हजार २० क्विंटल हरभऱ्यांचे ४ कोटी ९ लाख ४ हजार २९५ रुपये एवढ्या रकमचे चुकारे ६०५ शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत.
Purchase 20,000 quintals of gram in Parbhani, Hingoli
Purchase 20,000 quintals of gram in Parbhani, Hingoli

परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडतर्फे परभणी, हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघातर्फे खरेदी करण्यात आलेल्या हरभऱ्यापैकी ८ हजार २० क्विंटल हरभऱ्यांचे ४ कोटी ९ लाख ४ हजार २९५ रुपये एवढ्या रकमचे चुकारे ६०५ शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, दोन जिल्ह्यांतील १५ केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी १६ हजार ४८८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी परभणी जिल्ह्यातील ८ आणि हिंगोली जिल्ह्यातील ६ केंद्रांवर असे एकूण १४ केंद्रांवर गुरुवार (ता. १५) पर्यंत १ हजार ६५१ शेतकऱ्यांचा २० हजार ४८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यात राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यातील ६ केंद्रांवर ५८५ शेतकऱ्यांचा ६ हजार ३१ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यातील ६ केंद्रांवर ५५३ शेतकऱ्यांचा ८ हजार ८३६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. 

परभणी, पाथरी, पूर्णा या तीन केंद्रांवर खरेदी करण्यात आलेल्या ३ हजार ७० क्विंटल हरभऱ्याचे १ कोटी ५६ लाख ६१ हजार ८४५ रुपयाचे चुकारे २९५ शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. हिंगोली, कळमनुरी, जवळा बाजार, सेनगाव या चार केंद्रांवरील ४ हजार ९४९ क्विंटल हरभऱ्याचे २ कोटी ५२ लाख ४२ हजार ४५० रुपयाचे चुकारे ३१० शेतकऱ्यांना अदा करण्यात आले, असे जिल्हा व्यवस्थापक के. जे. शेवाळे यांनी सांगितले. 

विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रावर ५१३ शेतकऱ्यांचा ५ हजार १८० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले. 

बाजार समित्यांतील व्यवहार सुरू ठेवा  गेल्या आठवड्यात खुल्या बाजारातील हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली आहे. प्रतिक्विटंलचे दर ५ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्यातील शेतीमाल खरेदी, विक्रीचे व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

हरभरा खरेदी (क्विंटलमध्ये) 
केंद्र नोंदणी खरेदी शेतकरी संख्या
परभणी ४२५० २०१७ १७१ 
जिंतूर ७२२ ३९७ ३८ 
बोरी १५८५ ४१९ ४१ 
सेलू ७४२ २३७ १९ 
पाथरी ७६१ १९२५ २२४ 
पूर्णा ११३२ १०३५ ९२ 
मानवत ११५४ २००० १८३ 
गंगाखेड १३३२ ३१८० ३३०
हिंगोली १६५८ ३८३८ १८९ 
कळमनुरी ९३७ १०८७ ८५ 
वसमत ५८८ १३७ ८ 
जवळा बाजार २७५६ १९४५ १४६ 
सेनगाव ७८४ १५२८ १०६ 
साखरा १०८ ३०० १९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com