परभणी, हिंगोली जिल्ह्यात हमीभावाने १६ हजार क्विंटल हरभरा खरेदी

परभणी : सध्या हरभऱ्याचे खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शासकीय केंद्रावर हरभरा विक्रीकडे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.
Purchase 16,000 quintals of gram at guaranteed price in Parbhani, Hingoli district
Purchase 16,000 quintals of gram at guaranteed price in Parbhani, Hingoli district

परभणी : सध्या हरभऱ्याचे खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शासकीय केंद्रावर हरभरा विक्रीकडे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. या दोन जिल्ह्यातील १७ केंद्रांत शनिवार (ता.१९) पर्यंत ११ हजार ८४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १३ केंद्रांत १ हजार ७१ शेतकऱ्यांच्या १५ हजार ९८६.७५ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.

हरभऱ्याला हमीभावाने प्रतिक्विंटल ५२३० रुपये दर आहे. परभणी जिल्ह्यात ‘नाफेड’अंतर्गंत राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी, जिंतूर, बोरी (ता.जिंतूर), सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या आठ केंद्रांत ५ हजार ४०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ११३० शेतकऱ्यांना केंद्रांवर हरभरा विक्रीस घेऊन येण्यासाठी संदेश पाठविण्यात आले. परभणी, बोरी, मानवत, सोनपेठ, पूर्णा या पाच केंद्रांत ४०३ शेतकऱ्यांनी ५ हजार २२.५० क्विंटल हरभऱ्याची विक्री केली. 

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कन्हेरगाव (ता. हिंगोली), कळमनुरी, वारंगफाटा, वसमत, जवळा बाजार (ता. औंढानागनाथ), सेनगाव, साखरा या आठ केंद्रांत एकूण ५ हजार ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. या केंद्रांवरून २ हजार ८ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले.

हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगाफाटा, वसमत, जवळा बाजार, सेनगाव या सात केंद्रांत ६०४ शेतकऱ्यांनी १० हजार ७५.७५ क्विंटल हरभऱ्याची विक्री केली. विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यातील  गंगाखेड येथील केंद्रांत १ हजार २७१ शेतकऱ्यांचे नोंदणी अर्ज आले. त्यापैकी ९३६ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com