पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात  कडधान्य मूल्यवर्धन साखळी प्रकल्प 

भारतीय कृषी अनुसंधान परिषद-अखिल भारतीय समन्वयीन संशोधन प्रकल्पांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कडधान्य मूल्यवर्धन साखळीची स्थापना करण्यात आली आहे.
In Punjabrao Deshmukh Agricultural University Cereal Value Addition Chain Project
In Punjabrao Deshmukh Agricultural University Cereal Value Addition Chain Project
Published on
Updated on

अकोला ः शेतकऱ्यांसाठी नवनवीन कृषी प्रक्रिया यंत्रे निर्माण करीत ते त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज बनली आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतीय कृषी अनुसंधान परिषद-अखिल भारतीय समन्वयीन संशोधन प्रकल्पांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कडधान्य मूल्यवर्धन साखळीची स्थापना करण्यात आली आहे. याचे उद्‍घाटन कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील युवकांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. 

कडधान्यामध्ये प्रामुख्याने तूर, हरभरा, मूग आणि उडीद या धान्यांचा समावेश होतो. सर्व कडधान्य सफाई करणे व त्यापासून विविध मूल्यवर्धन पदार्थ (तूरडाळ, हरभराडाळ, मूगडाळ, उडीदडाळ, बेसन विविध पापड व पशुखाद्य कांड्या) तयार करून त्यांचे मूल्यवर्धन करणे हे या साखळीचे मुख्य काम आहे. कडधान्य प्रक्रिया व त्याचे मूल्यवर्धन या महत्त्वाच्या बाबी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढतो तसेच मालाची होणारी हाताळणी व वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.

अशा प्रकारच्या मूल्यवर्धन साखळी शेतकऱ्यांच्या स्थानिक जागेवर स्थापित करून त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे तसेच ग्रामीण भागातील युवकांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देऊन कडधान्य मूल्यवर्धन साखळीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 

या कार्यक्रमाला विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. राजेंद्र गाडे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ अभियंता रजनी लोणारे, नियंत्रक राजीव कटारे, कापणीपश्च्यात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे संशोधन अभियंता डॉ. प्रमोद बकाने यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या यंत्रांचा आहे समावेश  या कडधान्य मूल्यवर्धन साखळीमध्ये पीकेव्ही मिनी डाळमिल, पीकेव्ही स्क्रू पॉलिशर, पीकेव्ही क्लीनर ग्रेडर, पशुखाद्य पॅलेट मशिन, रोटरी विशिष्ट गुरुत्व विभाजक यंत्र, पापड बनवण्याचे यंत्र, बेसन मिल इत्यादी यंत्राचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com