चिंचेचे उत्पादन वाढले, अर्थकारण बिघडले

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चिंचाचे उत्पादनात दुप्पटीने वाढ झाली. परंतु वातावरणातील बदलामुळे चिंचांना बाधा पोहचत असल्याने या वर्षी चिंचेचे अर्थकारण व्यापारीदृष्ट्या आंबट झाले आहे.
चिंचेचे उत्पादन वाढले, अर्थकारण बिघडले The production of tadpoles increased, the economy deteriorated
चिंचेचे उत्पादन वाढले, अर्थकारण बिघडले The production of tadpoles increased, the economy deteriorated
Published on
Updated on

कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चिंचाचे उत्पादनात दुप्पटीने वाढ झाली. परंतु वातावरणातील बदलामुळे चिंचांना बाधा पोहचत असल्याने या वर्षी चिंचेचे अर्थकारण व्यापारीदृष्ट्या आंबट झाले आहे. जवळपास दीड महिन्यांपासून चिंच काढणी सुरू आहे.

जवळपास सर्वच झाडांच्या चिंचा काढणी योग्य झालेल्या आहेत. या पिकलेल्या चिंचेला बदलत्या हवामानाचा फार मोठा धोका असतो. साधे आभाळ देखील भरून आले तरी चिंचेला पाणी सुटून चिकटपणा निर्माण होतो व रंग बदलतो. गेल्या महिन्यांत अवकाळी पाऊस पडला व शिवारातील काढणीला आलेल्या जवळपास पन्नास टक्के चिंचेला याचा फटका बसला.

आता पुन्हा गत आठवड्यापासून वातावरणात बदल झाला असून, या बदललेल्या वातावरणामुळे चिंचेला पाणी सुटून रंग बदलू लागला आहे. याचा परिणाम चिंचांना मिळणाऱ्या दरावर होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २५ ते ३० टक्के दर कमी मिळत आहेत.

गत वर्षी चिंच झाडणाऱ्या मजुराला प्रतिदिन ६०० रुपये तर चिंचा गोळा करणाऱ्या महिलांना २०० रुपये दिवसाला मजुरी होती. यंदा चिंच झाडणाऱ्या मजुराला ७०० रुपये व गोळा करणाऱ्यांना अडीचशे रुपये हजेरी झाली आहे. चिंचा फोडण्यासाठी गेल्यावर्षी एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढी मजुरी होती. या वर्षी ही मजुरी दीड हजार रुपये प्रती क्विंटल झाली आहे.शिवाय या वर्षी डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने वाहतुकीचे देखील दर जवळपास ३० ते ३५ टक्यांनी वाढले आहे.  चिकट, रंग बदललेल्याने दरात घसरण या वर्षी हवामानातील बदल व अवकाळी पावसामुळे चिंचांना रंग बदलून चिकटपणा निर्माण झाला आहे. बाजारात कोरड्या व पिवळसर रंग असलेल्या चिंचेला योग्य भाव येतो.  मात्र या वर्षी चिंचा या रंगहीन व चिकट झाल्या आहे, त्यामुळे दरात देखील मोठी घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांची झाडांची खरेदी तेजीत  चिंच काढणीच्या चार महिने अगोदरच चिंचांचे व्यापारी झाडे खरेदी करीत असतात. गेल्या वर्षी फोडलेल्या चिंचेला प्रति क्विंटल १० हजार ते १८ हजारांपर्यंत भाव होता. हा भाव ग्रहीत धरूनच या वर्षी व्यापाऱ्यांनी चिंचेच्या झाडाची खरेदी केली. मात्र यावर्षी फोडलेल्या चिंचेचा दर प्रति क्विंटल ७ हजार ते १२ हजार दरम्यान राहिला आहे. खरेदी तेजीत मात्र भाव कमी राहिल्याने झाडे घेणारे व्यापारी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

प्रतिक्रिया या वर्षी चिंचेचे उत्पादन मोठे आहे. चिंचेच्या काढणी फोडणी वेचणी व वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. खर्च वाढला आहे, वातावरणातील बदलांमुळे मालाचा दर्जा बदलल्यामुळे दरात देखील घसरण झाली. त्यामुळे या वर्षी व्यापार हा तोट्यात जात आहे. -रौफ कोरबू, चिंच व्यापारी कसबे तडवळे जि उस्मानाबाद  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com