विंचूर एमआयडीसीत १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया

 विंचूर एमआयडीसीत १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया
विंचूर एमआयडीसीत १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया
Published on
Updated on

नाशिक  : निफाड तालुक्यातील विंचूर येथे सुरू झालेल्या अन्नप्रक्रिया उद्योगाचा प्रकल्प उभा राहिला आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी सुमारे १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून सदर शेतमाल निर्यात केला जाणार आहे. या प्रकल्पास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एमआयडीसीचे अधिकारी आणि शेतकऱ्यांसमवेत बुधवार (ता. १४) विंचूर येथील अन्नप्रक्रिया उद्योगाला भेट दिली. या वेळी भुजबळ यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी व कंपनीच्या समन्वयकांशी चर्चा केली. या प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची यंत्रसामग्री बसवून शेतमालावर प्रक्रिया करण्यात येत आहे. या अन्नप्रक्रिया उद्योगासाठी सुमारे १०० कोटी गुंतवणूक करण्यात येत असून, हा आशिया खंडातील सर्वात मोठा अन्नप्रक्रिया उद्योग या ठिकाणी साकारला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने पांढरा कांदा, मका, वटाणा, गाजर, लसूण, फ्लॉवर इत्यादी शेतमालावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या वेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता उईके, उपअभियंता नितीन पाटील, एस. एस. पाटील हे उपस्थित होते. या अन्नप्रक्रिया प्रकल्पात शेतीमालाबरोबरच प्रामुख्याने कांदा निर्जलीकरण प्रकल्प साकारण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार शेतकऱ्यांबरोबर करार करण्यात आला आहे. शिवसाई एक्स्पोर्ट अँड पॉलिशेट्टी सोमासुंदरम ऍग्रो एक्स्पोर्ट कंपनीचे संचालक सांबाशिव राव, नरेश चौधरी, मुख्य समन्वयक शिवदास आव्हाड, व्यवस्थापकीय संचालक सुधाकर रेड्डी यांनी उपस्थितांना या प्रकल्पाबद्दल माहिती दिली.  कांद्याची साठवणूक व प्रक्रिया केली जाणार  लासलगाव व येवला हे कांद्याचे आगार आहे. राज्यात पिकणाऱ्या कांद्याच्या उत्पादनापैकी ६० टक्के उत्पादन या भागातून होत असते. मात्र, कांद्याची साठवणूक केली जात नसल्यामुळे मार्केटमध्ये एकाच वेळी सर्व माल येतो त्यामुळे कांद्याचे भाव गडगडत असतात. या ठिकाणी शेतमालाचे १० हजार टन क्षमतेचे गोडाऊन उभारण्यात आले आहे. यामध्ये टिकाऊ माल जास्त काळ साठवला जाईल तसेच कांद्यावर त्वरित प्रकिया केली जाईल, त्यामुळे कांद्याला योग्य भाव मिळणार असून कांद्याचे नुकसान टळणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com