नाशिक जिल्ह्यात लम्पी त्वचा रोगामुळे पशुपालकांसमोर अडचणी

नाशिक : जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादूर्भाव झपाट्याने होत आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १८ हजारांवर जनावरे बाधित होती. त्यापैकी ९ हजार जनावरे बरी झाली आहेत.आतापर्यंत२ लाख १५ हजारावर जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
Problems facing livestock keepers due to lumpy skin disease in Nashik district
Problems facing livestock keepers due to lumpy skin disease in Nashik district
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादूर्भाव झपाट्याने होत आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १८ हजारांवर जनावरे बाधित होती. त्यापैकी ९ हजार जनावरे बरी झाली आहेत. आतापर्यंत २ लाख १५ हजारावर जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र अनेक ठिकाणी लस आणि वैद्यकीय सेवा शासकीय यंत्रणेकडून मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

जिल्ह्यात दहा लाखांपेक्षा अधिक पशुधन आहे. यात दुभत्या जनावरांची संख्या मोठी आहे. गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात संसर्गजन्य लम्पी प्रादुर्भावग्रस्त जनावरे आढळत आहेत. त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला, मालेगाव, इगतपुरी व सिन्नर या तालुक्यांमध्ये प्रादुर्भाव अधिक आहे. येवला, कळवण तालुक्यातील काही भागातही रोगाचा प्रादुर्भाव पसरताना दिसतो आहे. त्यात लस वेळेवर मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. 

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे वेगळा निधी नाही. त्यामुळे त्यांनी सेवा शुल्कातून जमा झालेल्या रकमेतून लसी खरेदी करण्याचे निर्देश तालुका पातळीवर दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून लम्पी त्वचारोग प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरणासाठी ग्रामनिधीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बाबूराव नरवाडे यांनी दिली. त्यामुळे काही अंशी दिलासा मिळणार आहे. सेवा पुरवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादूर्भाव वाढत आहे. मात्र पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार करूनही पशुवैद्यकीय अधिकारी व क्षेत्रीय पातळीवरील कर्मचारी वेळेवर येत नाहीत. त्यामुळे पशुपालकांना सेवा पुरविल्या जात नाहीत. संपर्क करूनही टाळाटाळ केली जात आहे. यावर लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष द्यावे. - हिरामण आव्हाड, पशुपालक, वडगाव सिन्नर, ता. सिन्नर

लस कमी उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेद्वारे ग्रामपंचायत निधीतून १५ हजार खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत. सेवा मिळत नसल्यास पशुपालकांनी कळवावे. - विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com