
नाशिक : ‘‘उभ्या पिकांचे नुकसान करू नका, वीजबिल वसुली करताना शेतकरी हा तुमचा एक ग्राहक आहे. त्यांना सन्मानाची वागणूक द्या. शेतकऱ्यांसोबत संयमाने बोला. पुढील वर्षांअखेर कृषी आकस्मिकतता निधीतून निफाड तालुक्यातील प्रमुख अडचण असलेल्या ओव्हरलोड रोहित्रांच्या जागी नवीन रोहित्र उभारा,’’ अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार दिलीप बनकर यांच्या मागणीवरून निफाड तालुक्यातील निर्माण होणाऱ्या विजेच्या अडचणी सोडवण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे रविवार (ता.६) रोजी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, रामभाऊ माळोदे, बाळासाहेब बनकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारशे, नगरसेवक सागर कुंदे, जावेद शेख, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, महापारेषणचे मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड, अधीक्षक अभियंता संजय खडारे,आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी कुमार, महापारेषणचे कार्यकारी अभियंता अनंत पाठक,अदिवासी विकासचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत,चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र आव्हाड,नाशिक ग्रामीणचे कार्यकारी अभियंता राजाराम डोगरे,निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे,गटविकास अधिकारी संदीप कराड,सार्वजनिक बांधकामचे अर्जुन गोसावी,निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ.श्रेया देवचके,गणेश बनकर,विश्वास मोरे आदीसह महावितरण विभागाचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना तनपुरे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना पूर्ण वेळ व्यवस्थित वीज मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेला शेतमाल मातीमोल होऊन जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीज उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास सरकार प्रयत्नशील आहे.’’ आमदार बनकर यांनी मनोगतात महावितरण कंपनीला पायाभुत सुविधांचा आभाव असल्याने अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची वीजबिल दुरुस्ती करून पिकाच्या काढणीनुसार वीजबिल वसुली करावी वीजबिल वसूल करताना सन्मानाची वागणूक द्यावी. मंजूर कामे लवकरात लवकर मार्गी लावली शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा न करता दिवस थ्री फेज वीजपुरवठा करावा असेच पिंपळगाव बसवंत येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता कार्यालय स्थापन करावे, अशा विविध मागण्या केल्या. उपस्थित शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडून येणाऱ्या अडचणीचा पाढा राज्यमंत्री तनपुरे यांच्या समोर मांडल्या.
केंद्र सरकार कोळसा पुरवण्यात कमी पडले कोळशाच्या खाणी या केंद्र सरकारच्या मालकीच्या असतात तिकडून तो आपल्याला मिळतो. केंद्र सरकार कोळसा पुरवण्यात कमी पडले, माझी कोणासमोरही चर्चेसाठी बसायची तयारी, राज्याने विजेचा प्रश्न खूप कौशल्याने हाताळला म्हणून लोडशेडिंग नाही अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पाठीशी न घालता एक चांगल्या दर्जाचे काम करून घ्या अशाही सूचना तनपुरे यांनी दिल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.