तेल्हाऱ्यात मूग पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव

पाथर्डी परिसरात यंदा मुगाच्या पिकावर मूंग बीन लीफ क्रिंकल या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने व हा रोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवणे सुरू केले आहे.
Outbreak of viral disease on green gram crop in oil
Outbreak of viral disease on green gram crop in oil
Published on
Updated on

अकोला ः कडधान्य उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी परिसरात यंदा मुगाच्या पिकावर मूंग बीन लीफ क्रिंकल या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने व हा रोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवणे सुरू केले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या भागातील शेतकरी पीक मोडत असून हंगामात हा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

पाथर्डी परिसरात सुमारे हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मुगाची जून महिन्यात लागवड झाली आहे. दरवर्षी या भागातील शेतकरी मूग, उडदाचे चांगले उत्पादन घेतात. यंदा लागवडीनंतर काही दिवसातच पिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला. शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा कीडनाशकांच्या फवारण्यासुद्धा घेतल्या. मात्र, पीक सुधारत नसल्याने अखेर त्यावर ट्रॅक्टर फिरवणे सुरू केले.

यंदा लागवड झालेल्या क्षेत्रापैकी ७० ते ८० टक्के पिकावर अशा प्रकारे रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. आत्तापर्यंत पेरणी, बियाणे, खत व तीन फवारण्यांवर शेतकऱ्यांचा हजारोंचा खर्च झालेला आहे. त्यातच आता पिकापासून कुठलेही फारसे उत्पादन येण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी उभ्या पिकावर नांगर फिरवू लागले आहेत.

मी २० ते २५ जून दरम्यान १५ एकरात मुगाची लागवड केली आहे. संपूर्ण कोकडा सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव  झालेला दिसून आला आहे. तीन फवारण्या करूनही कुठलाच फायदा झालेला नाही. त्यामुळे हे पीक मोडण्याशिवाय पर्याय नाही. गावातील प्रवीण कुकडे यांनी १० एकरातील पीक मोडले आहे. इतरांनीही मोडणे सुरू केले. - नितीन देठे, शेतकरी, पाथर्डी

यंदा लागवड झालेल्या मुगाच्या पिकावर मूंग बीन लीफ क्रिंकल व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. तालुक्यात जवळपास ३०० हेक्टरपर्यंत असे प्रादुर्भाव झालेले क्षेत्र असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कृषी विद्यापीठाच्या चमूने पाहणी केली आहे.   - मिलींद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा जि. अकोला

तेल्हारा तालुक्यात दिलेल्या भेटी दरम्यान मुगाच्या पानांवर प्रादुर्भाव झालेला दिसून आला.  रसशोषक किडी याचा प्रसार वाढवितात.  मावा, पांढरी माशी आदी किडींवर नियंत्रणासाठी शिफारसीत आंतरप्रवाही किटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. - डाॅ. मनोहर इंगोले,सहायक प्राध्यापक, कडधान्य संशोधन विभाग, पंदेकृवि, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com