
नगर ः कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानाअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून जिल्ह्यात गेल्यावर्षी केवळ २ हजार ८१६ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. मागणी मात्र ५६ हजार २११ शेतकऱ्यांनी केली होती.
यंदा जिल्ह्यात तर तब्बल १ लाख ९१ हजार ८०६ शेतकऱ्यांनी शेती अवजारांसाठी अनुदानाची मागणी केली आहे. गेल्यावर्षी १५ कोटींचा निधी मिळाला होता. त्यातील १३ कोटी ६ लाख ३२ हजार खर्च केले आहेत. यंदा मात्र अर्जाची संख्या अधिक असूनही अनुदानासाठी मात्र केवळ ६ कोटी ३२ लाख रुपये मिळाले आहेत.
शेती विकासासाठी कृषी विभागाद्वारे राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानाअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून शेतकऱ्यांना विविध शेती अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाते. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्तपणे शेती विकासाला प्राधान्य देत हा उपक्रम राबवला जात आहे. अवजारे अनुदानासाठी १५ कोटीचा निधी मिळाला होता. त्यातील १३ कोटी ६ लाख ३२ हजार खर्च केले.
यंदा डिसेंबरमध्ये कृषी यांत्रिकीकरणचे अर्ज ऑनलाइन मागवले. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सहा ते सात महिने उशिराने अर्ज मागवूनही गतवर्षीच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी अवजारांची मागणी केली. त्या तुलनेत यंदा निधी मात्र कमी केला आहे. राज्यासाठी यंदा ९९ कोटी ५३ लाख रुपये अनुदानावर खर्च केले जातील. जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा अधिक म्हणजे १ लाख ९१ हजार ८०६ शेतकऱ्यांनी अनुदानावर मागणी केली असली तरी अनुदानासाठी केवळ सहा कोटी ३२ लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे अर्ज भरूनही बहुतांश शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
तालुकानिहाय मागणीदार शेतकरी : नगर ः १०,८२२, पारनेर ः ११,५६३, पाथर्डी ः १६,१५६, कर्जत ः २०,१३२, जामखेड ः ८,६९४, श्रीगोंदा ः २५,२४७, श्रीरामपूर ः ७,४३४, राहुरी ः ९,५९०, नेवासा ः २४,४४४, शेवगाव ः १९,५२०, संगमनेर ः १०,७५०, अकोले ः ८,४९५, राहाता ः ७,३८३, कोपरगाव ः ११,५७५.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.