कांदा उत्पादकतेत एकरी ३० टक्क्यांपर्यंत घट

शाखीय वाढ होताना थंडीचा अभाव व वाढलेल्या तापमानामुळे कांदा मुदतपूर्व काढणीस आला. परिणामी, एकरी ३० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट झाल्याचे उत्तर महाराष्ट्रात दिसून येत आहे.
Onion production reduced by 30% per acre
Onion production reduced by 30% per acre

नाशिक : चालू वर्षी अतिवृष्टी, तापमान वाढ, अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा फटका उन्हाळ कांदा पिकाला बसला. त्यात वाढीच्या अवस्थेत रोग, किडींचा प्रादुर्भाव, शाखीय वाढ होताना थंडीचा अभाव व वाढलेल्या तापमानामुळे कांदा मुदतपूर्व काढणीस आला. परिणामी, एकरी ३० टक्क्यांपर्यंत उत्पादकतेत घट झाल्याचे उत्तर महाराष्ट्रात दिसून येत आहे.

नाशिक विभागात चालू वर्षी १ लाख ९१ हजार ९३८ हेक्टर कांदा लागवडी आहेत. सध्या काढणीला वेग आला असून, सरासरी १५० क्विंटल मिळणारे एकरी उत्पादन १०० ते ११० क्विंटलपर्यंत मिळत आहे. तर काही ठिकाणी ७५ क्विंटलवर उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी ५० टक्क्यांपर्यंत घट दिसून येत आहे. सरासरी ही घट ३० टक्क्यांपर्यंत झाल्याचे झाल्याचे चित्र आहे. डिसेंबर ते जानेवारी मध्यापर्यंत झालेल्या लागवडीमध्ये उत्पादन चांगले असले तरी घट दिसून येत आहे. तर १५ जानेवारीनंतर लागवडीत घट अधिक आहे. या वर्षी कमाल तापमान व किमान तापमानात दुपटीचा फरक राहिला. मात्र डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून हे सरासरी तापमान  २७ अंश सेल्सिअस, जानेवारीत ३० तर फेब्रुवारीत ३० अंशांवर होते.

येत्या काळात दरवाढीची आशा कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. तूर्तास शेतकरी येत्या काळात कांद्याचे उत्पादन घटीमुळे चांगले तर मिळतील, या आशेवर आहेत.

उत्पादन घटण्याची प्रमुख कारणे

 • शाखीय वाढ होण्याच्या कालावधीत थंडीचा अभाव अन् तापमानात वाढ
 • विविध कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची झालेली फसवणूक
 • जमिनीत बुरशी वाढण्यामुळे कांद्याची अपेक्षित वाढ नाही
 • आठ दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे काढणीपूर्व नुकसान
 • अधिक कालावधीच्या रोपांच्या उशिरा लागवडी
 • फूल, कीड यांचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक
 • हवामान बदल, प्रतिकूल वातावरण, जमिनीत वाढलेले बुरशीचे प्रमाण यासह काढणीपूर्वी झालेली गारपीट यामुळे एकरी ५० टक्के उत्पादनात घट आहे.   - वैभव शिंदे, कांदा उत्पादक, शिरवाडे, ता. साक्री, जि. धुळे

  चालू वर्षी सुरुवातीला रोपवाटिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्यामुळे दुबार बियाणे खरेदी करताना त्यात खरीप व रब्बी असे मिश्र बियाणे निघाल्याने फसवणूक झाली. आगाप लागवडीत रोपे पावसामुळे बाधित झाल्याने त्यांची वाढ झालेली नाही. हंगामाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अडचणी असल्याने एकरी उत्पादन कमी येत आहे. - शिवाजी ढाकणे, कांदा उत्पादक, चास, ता. सिन्नर

  हंगामानुसार वेळेवर लागवड हे उत्पादनाचे मुख्य सूत्र आहे. त्यामुळे कीड व रोग यांचा प्रादुर्भाव हा तुलनेने कमी असतो. मात्र या वर्षी लागवडीचे हंगामी नियोजन कोलमडल्याने एकरी उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. - तुषार आंबरे, तंत्र अधिकारी, एनएचआरडीएफ, नाशिक

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com