खानदेशात भेंडीचे दर स्थिर

जळगाव ःखानदेशात भेंडीचे दर टिकून आहेत. आवक अल्प आहे. किमान १४०० व कमाल २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. जळगाव बाजार समितीत सध्या जामनेर, यावल, औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड भागांतून आवक होत आहे.
खानदेशात भेंडीचे दर स्थिर
खानदेशात भेंडीचे दर स्थिर

जळगाव ः  खानदेशात भेंडीचे दर टिकून आहेत. आवक अल्प आहे. किमान १४०० व कमाल २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. जळगाव बाजार समितीत सध्या जामनेर, यावल, औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड भागांतून आवक होत आहे. 

खानदेशात भेंडी लागवडीसाठी धरणगाव, एरंडोल, पाचोरा, भडगाव, पारोळा, भुसावळ आदी भाग आघाडीवर आहे. बारमाही भेंडी लागवड या भागांत सुरू असते. परंतु यंदा विषम, प्रतिकूल वातावरणाचा फटका पिकाला सतत बसला आहे. बाजार व्यवस्था सुरळीत राहिल्याने भेंडीचा उठाव कायम आहे. धुळे भागातही भेंडीला उठाव आहे. तेथून गुजरात, इंदूर (मध्य प्रदेश) येथेही भेंडीची पाठवणूक केली जात आहे. यातच लागवड कमी आहे. दर्जेदार पीकही फारसे नाही. यामुळे आवक कमी असते. जळगाव येथील बाजारात मागील दीड महिन्यापासून आवक प्रतिदिन १४ ते १५ क्विंटल एवढीच आहे. मागणी कायम आहे. 

हॉटेलमध्येही भेंडीची गरज वाढली आहे. परिणामी, किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४५, ५० ते ६० रुपयेदेखील दर आहेत. बाजार समितीमध्ये दर्जेदार भेंडीला तीन हजार रुपये प्रतिक्विंटलवर दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना भेंडी परवडत आहे. धरणगाव, एरंडोल भागांत आवक ३० ते ३५ टक्के कमी आहे. या भागांतून मोठे खरेदीदार, एजंट थेट मुंबई, गुजरातच्या बाजारात भेंडी पाठवितात. भेंडीची मागणी पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. 

उन्हाळी भेंडीची लागवड सुरू  

लग्नसराई व इतर कार्यक्रम पुढे पुन्हा सुरू होतील. कोविडचे प्रतिबंध असले, तरी कोविडमुळे हानी होत नसल्याचे दिसत असल्याने भेंडीचे दर टिकून राहतील, असा अंदाज आहे. भेंडीची लागवड सुरू आहे. पुढे ४५ ते ५५ दिवसांत काढणी सुरू होईल. मार्चमध्ये आवक काहीशी वाढेल, असेही सांगितले जात आहे. उन्हाळी भेंडीची सुमारे ३०० ते ४०० हेक्टरवर जळगाव जिल्ह्यात लागवड अपेक्षित आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com