वाईट अनुभव : गावशिवार नकाशा हवाय? करा ५०० रुपये खर्च

वाईट अनुभव : गावशिवार नकाशा हवाय? करा ५०० रुपये खर्च
वाईट अनुभव : गावशिवार नकाशा हवाय? करा ५०० रुपये खर्च

जळगाव ः गावशिवाराचा नकाशा हवा असेल तर ५०० रुपये लागतील. रीतसर अर्ज करून नकाशा दुसऱ्या दिवशी मिळेल की नाही, याची शाश्‍वती नाही, अशी बेजबाबदार उत्तरे येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी शेतकरी, ग्रामस्थांना देत आहेत. शेत मोजणीची अनेक प्रकरणे दोन ते तीन महिन्यांपासून प्रलंबित असून, खिसे गरम केल्याशिवाय मोजणीची कामे या कार्यालयातील मंडळी करीत नसल्याची माहिती या कार्यालयात वाईट व धक्कादायक अनुभव आलेल्या जळगाव तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील एका शेतकऱ्याने आपले नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितली आहे.  भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे ‘आ अब्दुल्ला भर गुड थैली में,’ असा प्रकार झाल्याचा संतापही या शेतकऱ्याने सांगितला. या शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शेतात अतिक्रमण झाल्याने शेत मोजणी करायची होती. मोजणी व्यवस्थित व्हावी, आपल्याकडे आपल्या शेताचा आकार, हद्द याची प्राथमिक माहिती असावी यासाठी गावशिवाराचा सर्टिफाइड नकाशा हवा होता. हा नकाशा तलाठ्याकडे मिळाला नाही. मग भूमी अभिलेख कार्यालयात पोचलो. तेथे सर्टिफाइड नकाशाची मागणी केली. परंतु हा नकाशा देणारे कर्मचारी कोण? हा खुलासा सुरवातीचे १५ मिनिटे झाला नाही. वणवण फिरल्यावर एका पाटील नामक कर्मचाऱ्याकडे विचारा, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. त्याच्याकडे गेलो असता त्याने कोर्टाच्या कामासाठी नकाशा हवा असेल तरच घ्या. नाहीतर जळगावातील भोळे याच्याकडे जा. तेथे १०० रुपयांत नकाशा मिळेल. आमच्याकडून नकाशा हवा असेल, तर ५०० रुपयांपर्यंत खर्च लागेल. रीतसर अर्ज केला तरी दुसऱ्या दिवशीदेखील हा नकाशा मिळेल की नाही, याची शाश्‍वती नाही, असेही हा कर्मचारी म्हणाला. शेवटी भोळेनामक खासगी व्यक्तीकडून हा नकाशा आणावा लागला. तेथे १५० रुपये खर्च आला.  भूमी अभिलेख कार्यालयात प्रमुख कोण, तेथे नियंत्रणहीन कारभार सुरू आहे. जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन या संदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणीदेखील संबंधित शेतकऱ्याने ॲग्रोवनच्या माध्यमातून केली आहे. मोजणीसाठी 'तारीख पे तारीख' आपल्या गावातील दोन शेतकऱ्यांनी शेतमोजणीसाठी दोन महिन्यांपूर्वी अर्ज दिले होते, परंतु शेतमोजणी केली जात नव्हती. तारीख वर तारीख सांगत होते. संबंधित शेतानजीकच्या इतर शेतकऱ्यांना शेतमोजणीसाठी नोटिसादेखील बजावत नव्हते. मग १० तारखेला नोटिसा बजावल्या. त्यात मोजणीची तारीख ७ व ८, अशी होती. मोजणी मात्र ११ मे रोजी केली. मोजणीनंतर खिसे गरम करावे लागतात. तसे ठरविल्याशिवाय मोजणीलाच कुणी येत नाही, अशा तक्रारीदेखील ॲग्रोवनकडे शेतकऱ्यांनी केल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com